महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उपराज्यपाल अन् आप नेत्यांमध्ये चर्चा

06:17 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीतील जलसंकटाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीत पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी तसेच राज्याच्या मंत्र्यांनी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची रविवारी भेट घेतली आहे. हरियाणा सरकार दिल्लीच्या हिस्स्याचे पाणी देत नसल्याचे आम्ही उपराज्यपालांना सांगितले आहे. हरियाणा सरकारसोबत यासंबंधी चर्चा करणार असल्याचे आश्वासन उपराज्यपालांनी दिले असल्याचे दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.

दिल्ली सरकार तसेच आम आदमी पक्षाच्या वतीने उपराज्यपालांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात राज्यसभेचे दोन खासदार देखील सामील होते. याचबरोबर आमचे आमदारही सामील होते. चांगल्या वातावरणात चर्चा झाली आहे. हरियाणा सरकारशी चर्चा करण्याची विनंती आम्ही उपराज्यपालांना केली आहे. हरियाणा सरकार अद्याप 113 एमजीडी पाणी दिल्लीकरता कमी सोडत आहे. यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागतोय. हरियाणा सरकारसोबत चर्चा करत दिल्लीला त्याच्या हिस्स्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपराज्यपालांकडून मिळाल्याचा दावा भारद्वाज यांनी केला.

लवकरच पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. पाऊस सुरू झाल्यावर हरियाणा  पाणी रोखू शकणार नाही. याचमुळे एक आठवड्यासाठी अधिक पाणी सोडण्याची मागणी हरियाणा सरकारसमोर करण्यात यावी अशी भूमिका मांडण्यात आली असल्याची माहिती भारद्वाज यांनी दिली.

आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. उपराज्यपालांनी आमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि आश्वासनही दिले आहे. आम्ही उपराज्यपालांना दिल्लीला हरियाणाकडून 113 एमजीडी पाणी कमी मिळाल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले आहे. उपराज्यपालांनी याप्रकरणी हरियाणा सरकारसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच दिल्लीतील पाण्याची समस्या संपुष्टात आणण्यासाठी आखलेल्या योजनेवरही उपराज्यपालांशी चर्चा करण्यात आली. यात यमुनेच्या काठानजीक पावसाच्या पाण्याचा साठा करण्याचा मुद्दाही सामील आहे. 22 किलोमीटरच्या यमुनेच्या काठावर पाण्याचा साठा करण्याची व्यवस्था झाली तर दिल्लीत पाण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघणार असल्याचे आमदार सोमनाथ भारती यांनी म्हटले आहे.

आतिशी यांचे उपोषण

दिल्लीच्या अनेक भागांमध्ये जलसंकट निर्माण झाले असताना दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी बेमुदत उपोषण चालविले आहे. हरियाणाच्या हथिनी कुंडात पुरेसा पाणीसाठा आहे, तरीही हरियाणा सरकारने दिल्लीला पाणी सोडण्यात येणारे गेट बंद केले आहे. हरियाणा सरकार जोपर्यंत दिल्लीच्या हिस्स्याचे पाणी सोडत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article