For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री भजनलाल अन् वसुंधरा राजे यांच्यात चर्चा

06:25 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री भजनलाल अन् वसुंधरा राजे यांच्यात चर्चा
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शर्मा यांनी राजे यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पोटनिवडणुकीवरून चर्चा झाल्याचे मानले जात आहे.

राजस्थानमध्ये 5 जागांकरता पोटनिवडणूक होणार असून यातील 4 जागा पूर्व राजस्थना आणि शेखावटी भागातील आहेत. या क्षेत्रांमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत होणाऱ्या बहुतांश भाजप उमेदवारांनी वसुंधरा राजेंकडून प्रचार न झाल्याने पराभव पत्करावा लागल्याचे सांगितले आहे. याचमुळे आता पक्षसंघटनेने वसुंधरा राजे यांना प्रचारमोहिमेत सामील करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

Advertisement

वसुंधरा राजे यांनी बारां-झालावाड वगळता अन्य कुठल्याही लोकसभा मतदारसंघात प्रचार करणे टाळले होते. यावरून त्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. पोटनिवडणुकीत वसुंधरा राजे यांनी प्रचार करावा याकरता आता पावले उचलली जात आहेत. याचकरता मुख्यमंत्री शर्मा यांनी त्यांची भेट घेतली आहे. 13 जुलै रोजी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून यात पक्षाध्यक्ष सामील होणार आहेत. अशा स्थितीत या बैठकीत राजे यांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.