For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यापीठात धर्माच्या आधारावर पक्षपात

06:41 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
विद्यापीठात धर्माच्या आधारावर पक्षपात
Advertisement

अलिगढ विद्यापीठात हिंदू शिक्षिकेवर उघड अन्याय

Advertisement

वृत्तसंस्था / अलिगढ (उत्तर प्रदेश)

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात काम करणाऱ्या एका हिंदू प्राध्यापिकेवर धर्माच्या आधारावर अन्याय करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्राध्यापिकेने ही व्यथा मांडताना तिच्यावर ओढविलेल्या अनेक प्रसंगांची माहिती दिली आहे. या प्राध्यापिकेचे नाव रचना कौशल असे असून ती 27 वर्षे या विद्यापीठात आहे.

Advertisement

प्रा. रचना कौशल या अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात काम करतात. त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. आपण हिंदू असल्याने आपल्याला अन्य धर्माचे ज्येष्ठ अधिकारी लक्ष्य करीत असल्याची अधिकृत तक्रार त्यांनी विद्यापीठाच्या उपकुलगुरुंना सादर केली आहे. आपल्या आरोपांच्या पुष्ठ्यार्थ त्यांनी अनेक ध्वनिमुद्रणेही तक्रारीसह सादर केली आहेत.

1998 पासूनच छळ

1998 मध्ये रचना कौशल यांनी या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात प्राध्यापिकेचे काम करण्यास प्रारंभ केला होता. तेव्हापासूनच त्यांचा धर्माच्या आधारावर छळ केला जात आहे. त्यांना प्रचंड मानसिक त्रास त्यांच्या वरिष्ठांकडून दिला जात आहे. तुम्ही हिंदू असल्याने तुम्हाला येथे काम करता येणार नाही, असे त्यांना अनेकदा ऐकवण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. त्यांचे मुस्लीम ज्येष्ठ अधिकारी त्यांना हेतुपुरस्सर अधिक काम लावत असत. तसेच हिंदू धर्मावरुन त्यांना टोमणेबाजीही ऐकवली जात आहे. यामुळे अनेकदा त्याना मनस्ताप होऊन त्यांना प्रकृती अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागत आहे. याच मानसिक तणावामुळे आपला गर्भपातही झाला होता, असे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.

डीन विरोधात अनेक आरोप

प्रा. कौशल यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे डीन मोहम्मद नफीस अहमद अन्सारी याच्या विरोधात अनेक आरोप आपल्या तक्रारीत केले आहेत. अन्सारी नेहमी कौशल यांना त्यांच्या धर्मावरुन छळत आहेत. तुम्ही हिंदू आहात, त्यामुळे तुम्ही बनारस हिंदू विद्यापीठात जा, असे आपल्याला डीनकडून ऐकवले जात आहे. हिंदू प्राध्यापक हेतुपुरस्सर मुस्लीम विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. तसेच विद्यापीठाच्या सभांमध्ये हिंदू प्राध्यापकांची वर्तणूक योग्य नसते, असे खोटे आक्षेपही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतले जातात. यामुळे या विद्यापीठातील हिंदू प्राध्यापकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मला स्वत:ला असे अनेक अनुभव आले आहेत, असे कौशल यांचे आरोप आहेत.

Advertisement
Tags :

.