पृथ्वीवरील सर्वात जुन्या मुंगीचा शोध
113 दशलक्ष वर्षांपूर्वीची एक मुंगी मिळाली आहे. ही मुंगी डायनासोरांच्या काळात अस्तित्वात होती. ब्राझीलच्या उत्तरपूर्व हिस्स्यात शोधण्यात आलेल्या या प्राचीन मुंगीला वैज्ञानिकांनी ‘हेल ऐंट’ नाव दिले आहे. ही हेल ऐंट आतापर्यंत मिळालेल्या कुठल्याही मुंगीपेक्षा सर्वात जुनी आहे. ही सुमारे 113 दशलक्ष वर्षांपूर्वीची मुंगी असल्याचे मानले जात आहे. या शोधाचा पूर्ण तपशील नियतकालिक ‘करंट बायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाला आहे.
ही मुंगी चुनादगडात संरक्षित मिळाली आहे. तर पूर्वी ज्या सर्वात जुन्या मुंगीचे नमुने मिळाले होते, ते एम्बरमध्ये होते. हे एम्बरचे नमुने फ्रान्स आणि म्यानमारमधून मिळाले होते. या मुंगीने वैज्ञानिकांना चकित केले आहे. या शोधामुळे पृथ्वीवर जीवनाच्या विकासावरुन अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पावलो विद्यापीठाच्या म्युझियम ऑफ जूलॉजीशी संबंधित एंडरसन लेपेको आणि त्यांच्या टीमने हा शोध लावला आहे. टीमने ब्राझीलच्या क्रेटो फॉर्मेशन नावाच्या ठिकाणी या मुंगीला शोधले आहे. हा भाग स्वत:च्या जीवाश्म संरक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पहिल्यांदाच आम्हाला एखाद्या खडकात इतक्या जुना हेल एंsंट पहायला मिळाल्याचे लेपेको यांनी म्हटले आहे.
या मुंगीचा जबडा अजब प्रकारे निर्माण झालेला होता, जो याला शिकारीसाटी अत्यंत खास ठरवत होता. टीमने मायक्रो-सिटी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करत याच्या शरीराच्या अंतर्गत हिस्स्यांचे 3डी इमेजिंग केले, याचे निष्कर्ष चकित करणारे होत. या मुंगीचे फीडिंग अपरेटस म्हणजेच खाण्याच्या सिस्टीममध्ये इतकी जटिल रचना मिळाली, जी त्या काळात मुंग्यांनी देखील खास प्रकारे शिकार करणे शिकून घेतल्याचे दाखवून देणारी होती. ही मुंगी म्यानमारच्या एम्बरमध्ये मिळालेल्या हेल ऐंट्सशी अत्यंत मिळतीजुळती आहे. म्हणजेच 113 दशलक्ष वर्षांपूर्वीच मुंग्या जगभरात फैलावल्या होत्या आणि स्वत:च्या शिकारीच्या पद्धतींमध्ये खास प्रकारची विविधता विकसित केलेल्या होत्या. हा शोध मुंग्यांच्या विकासाला नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी देतो, तसेच डायनासोरांसोबत पृथ्वीवर किती जटिल जीवन प्रणाली विकसित झाल्या होत्या याचे संकेतही देतो.