For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिक नष्ट करणाऱ्या एंजाइमचा शोध

06:12 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिक नष्ट करणाऱ्या एंजाइमचा शोध
Advertisement

चिनी संशोधकांचा दावा

Advertisement

प्लास्टिक कचरा जगासाठी गंभीर आव्हान ठरला आहे, परंतु चिनी वैज्ञानिकांनी कचरास्थळांवरून अशा एंजाइमचा शोध लावला आहे, जो प्लास्टिक नष्ट करण्यास मदत करू शकतो. प्लास्टिक जमा होण्याचा वेग असाच कायम राहिला तर पृथ्वीवर 2050 पर्यंत सुमारे 1,100 कोटी मेट्रिक टन प्लास्टिक जमा होऊ शकते. परंतु हे नवे एंजाइम या समस्येवर तोडगा काढण्यास उपयुक्त ठरू शकते.

यासंबंधीचे संशोधन चीनच्या अनहुई विद्यापीठ आणि अन्य संस्थांच्या वैज्ञानिकांनी केले आहे आणि याचे निष्कर्ष पीएनएएस नेक्सस नावाच्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधकांनुसार एंजाइम आणि सूक्ष्मजीवांच्या मदतीने प्लास्टिक तोडणे आणि पुन्हा वापरात आणणे एक उपयुक्त उपाय ठरू शकतो. अध्ययनात लियान सोंग आणि त्यांच्या टीमने मेटाजीनोमिक्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानांची मदत घेतली. याच्या मदतीने त्यांनी जगभराच्या लँडफिलमधून प्लास्टिक तोडणारे बायोकॅटेलिटिक एंजाइम एकत्र केले. बायोकॅटेलिटिक एंझाइम नैसर्गिक प्रोटीन असतात, जे प्लास्टिकला छोट्या आणि सरळ अणूंमध्ये तोडतात. यामुळे प्लास्टिकला वेगाने नष्ट करणे आणि पुनर्वापरक्षम करणे शक्य ठरते.

Advertisement

संशोधकांनी हे नमुने चीन, इटली, कॅनडा, ब्रिटन, जमैका आणि भारतातून एकत्र केले. संशोधकांनी 31,989 संभाव्य प्लास्टिक-ब्रेकिंग एंजाइम्सना शोधण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेलचा वापर केला. यानंतर 712 एंझाइम्सचे सखोल अध्ययन करण्यात आले, जेणेकरून त्यांचे कार्य आणि त्यांच्याशी निगडित सूक्ष्मजीवांना समजून घेता येईल.

सूक्ष्म कणांमध्ये रुपांतर

या एंझाइम्समध्sय प्लास्टिक नष्ट करण्याची मोठी क्षमता आहे. हे एंझाइम प्लास्टिकमध्ये असलेल्या पॉलिमरला छोट्या-छोट्या मोनोमर्समध्ये तोडतात. एकप्रकारे हे एंझाइम मुंग्यांच्या जबड्याप्रमाणे काम करते. काही प्रकरणांमध्ये हे प्लास्टिकला 24 तासांपेक्षाही कमी वेळेत तोडून मोनोमर्समध्ये बदलते. हे एंझाइम लँडफिलमध्ये जमा होत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याला कमी करण्यास मदत करतात आणि रिसायकलिंगला चालना देण्यास मदत करतात.

Advertisement
Tags :

.