For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅमथच्या हाडांनी निर्मित महालाचा शोध

06:55 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅमथच्या हाडांनी निर्मित महालाचा शोध
Advertisement

रहस्यमय स्थळ पाहून तज्ञ अवाक्

Advertisement

रशियाची राजधानी मॉस्कोच्या दक्षिणेत झालेल्या एका अनोख्या शोधामुळे वैज्ञानिक चकित झाले आहेत. तेथे सुमारे 40 हजार वर्षे जुन्या मॅमथच्या (हजारो वर्षांपूर्वी विलुप्त झालेला दैत्याकार प्राणी) अवशेषांद्वारे निर्मित एक रहस्यमय ‘हाडांचा महाल’ शोधण्यात आला आहे. ही संरचना हाडांच्या मदतीने तयार करण्यात आली असल्याने या अस्थी अवशेषांना आतापर्यंत मिळालेले सर्वात जुने आणि सर्वात मोठे मॅमथ हाउस मानले गेले आहे. या स्थानावर अवशेष मूळ स्वरुपात काही वर्षांपूर्वी मिळाले होते, परंतु नव्या संशोधनातून विशाल आकाराची हाडं 40 हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संरचना मॅमथच्या हाडांद्वारे का निर्माण करण्यात आली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रशियात संशोधकांनी मॉस्कोपासून 300 मैल अंतरावर शिकारी-संग्रहकर्ता अवशेषाच्या ठिकाणी उत्खनन केले. उत्खननस्थळावर 1960 आणि 70 च्या दशकात छोटे अवशेष आढळून आले होते. परंतु यावेळी अविश्वसनीय आकाराचे अवशेष मिळाले आहेत. एंटिक्विटी जर्नलच्या अहवालानुसार संशोधकांनी जवळपास 30 फूट गुणिले 30 फुटाची संरचना शोधली असून ती विशाल हाडांनी निर्माण करण्यात आलेली आहे. तसेच ती हिमयुगाच्या काळातील आहे.

Advertisement

भिंतींमध्ये मिळाली जबड्याची हाडं

शोधण्यात आलेल्या संरचनेच्या भिंती 51 विशाल जबड्याची हाडं आणि 64 विशाल कवट्यांनी निर्माण करण्यात आल्या होत्या. कोस्टेंकी 11 या कठोर वातावरणात राहणाऱ्या पुरापाषाणकालीन शिकारी-संग्रहकर्त्यांचे एक दुर्लभ उदाहरण सादर करते.  मॅमथ आणि मनुष्य सामूहिक स्वरुपात या क्षेत्रात आले असतील कारण यात एक नैसर्गिक झरा होता, जो पूर्ण हिवाळ्यात न गोठता पाणी उपलब्ध करत होता. माणसांच्या हातून मारले गेलेल्या मॅमथची ही हाडं आहेत का नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या मॅमथची आहेत हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. संशोधक सातत्याने या ठिकाणी पडताळणी करत असून यातून अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा असल्याचे उद्गार संशोधनाचे प्रमुख पुरातत्वतज्ञ डॉक्टर अलेक्जेंडर प्रायर यांनी काढले आहेत.

रशियात हा शोध मेक्सिको सिटीनजीक विशाल मॅमथशी संबंधित एक डझनाहून अधिक सांगाडे आढळल्यावर लागला आहे. मेक्सिको सिटीच्या उत्तर दिशेला असलेल्या टुल्टेपेकमध्ये दोन खड्ड हे आतापर्यंत शोधण्यात आलेले पहिले वूली मॅमथ जाळे आहेत. या खड्डयांमध्ये किमान 14 ऊनी मॅमथांचे अवशेष होते आणि जवळपास 800 हाडं मिळील होती. माणूस या विशाल सस्तन प्राण्यांची शिकार मशाली आणि फांद्यांच्या मदतीने करत होता असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :

.