For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माकडाच्या नव्या प्रजातीचा शोध

07:00 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
माकडाच्या नव्या प्रजातीचा शोध
Advertisement

नारिंगी ओठ, वेगळ्या प्रकारचा आवाज

Advertisement

आफ्रिकेच्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या घनदटा जंगलांमध्ये एका नव्या माकडाला वैज्ञानिकांनी नवी प्रजाती मानले आहे. या माकडाचे नाव ‘लिक्वेली“ ठेवण्यात आले आहे. याची माहिती पीएलओएस वन नियतकालिकात प्रकाशित नव्या अध्ययनात देण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी अनेक वर्षांपर्यंत याची रचना, आवाज, राहण्याच्या पद्धती आणि डीएनएची तपासणी केली. यानंतर ही पूर्वीच ओळखण्यात आलेल्या कुठल्याही माकडाच्या प्रजातीपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट झाले. मागील 75 वर्षांमध्ये आफ्रिकेत मिळालेली ही माकडाची केवळ पाचवी नवी प्रजाती असल्याने हा शोध खास आहे.

या माकडाचे छायाचित्र 2008 साली पहिल्यांदा टिपण्यात आले होते. परंतु ते छायाचित्र स्पष्ट नव्हते. यानंतर सुमारे 10 वर्षांपर्यंत वैज्ञानिक याला पुन्हा पाहू शकले नाहीत. नंतर लोमामी नॅशनल पार्कमध्ये संशोधन सुरू झाल्यावर हे माकड पुन्हा दिसून आले. यानंतर त्याची ओळख पटविण्यासाठी अनेक वर्षांपर्यंत सातत्याने संशोधन करण्यात आले. वैज्ञानिक अनेक वर्षांपर्यंत या माकडाच्या मागावर राहिले. त्यांनी जंगलात त्याचा अधिवासही पाहिला, त्याचा आवाज ध्वनिमुद्रीत केला आणि याचे वर्तन समजून घेतले. संशोधकांची टीम आसपासच्या 52 गावांमध्येही पोहोचली. यातील केवळ 8 गावांमधील  लोकांनी या माकडाला ओळखत असल्याचे सांगितले. यातून हे माकड अत्यंत छोट्या भागात राहत असल्याचे कळते.

Advertisement

इतर माकडांपेक्षा वेगळे

वैज्ञानिकांनुसार लिक्वेली कोलोबस परिवारातील माकड आहे. परंतु याची ओळख वेगळी आहे. याच्या ओठांच्या आसपास नारिंगी आणि सौम्य क्रीम रंगाचा हिस्सा आहे. याच्या शरीराच्या मागे पांढऱ्या रंगाचा एक पॅचही असतो. याचे केस आणि आवाज देखील इतर कोलोबस माकडांपेक्षा वेगळा आहे. वैज्ञानिकांनी याच्या डीएनएची देखील तपासणी केली आहे. यात याचे सर्वात नजीकचे नाते ब्लॅक कोलोबससोबत असल्याचे कळले. परंतु दोन्ही प्रजाती सुमारे 50 लाख वर्षांपूर्वी परस्परांपासून वेगळ्या झाल्या होत्या. याचमुळे वैज्ञानिकांनी याला नवी प्रजाती मानले आहे. याचे शास्त्राrय नाव कोलोबस काँगोनेसिस ठेवण्यात आले आहे.

माकडांवर संकट

हे माकड केवळ सुमारे 1700 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातच आढळून येते. म्हणजेच याची पूर्ण संख्या अत्यंत छोट्या क्षेत्रात राहते. याचमुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका अधिक असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. संशोधनादरम्यान वैज्ञानिकांना काही अशी माकडं देखील मिळाली, ज्यांची अवैध शिकार करण्यात आली होती. याचबरोबर जंगलतोड आणि शेतीसाठी जमीन वाढविण्यात आल्याने त्यांचा अधिवास आकुंचित पावत आहे.

आता काय करावे लागेल?

कोलोबस काँगोनेसिसला लुप्तप्राय प्रजातींच्या यादीत सामील केले जावे, जर वेळीच त्यांचे जंगल आणि अधिवास वाचविण्यात न आल्यास ही नवी प्रजाती संकटात सापडू शकते असे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचे सांगणे आहे. जगातील अनेक जंगलांमध्ये आजही असे प्राणी अस्तित्वात आहेत, ज्यांच्याविषयी वैज्ञानिकांना अद्याप पूर्णपणे माहिती नाही हे लिक्वेलीच्या शोधातून कळते. जंगल आणि वन्यजीवांना वाचविणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अशा दुर्लभ प्रजाती भविष्यातही सुरक्षित राहू शकतील अशी आठवण हा शोध करून देतो.

Advertisement
Tags :

.