डायनासोरच्या नव्या प्रजातीचा शोध
14.7 कोटी वर्षांपूर्वीचा जीवाश्म सापडला
डायनासोरांच्या उडू शकणाऱ्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. बावरिया नावाच्या भागात हा उडणारा टेरोसॉर पक्षी 14.7 कोटी वर्षांपूर्वीपर्यंत आढळून येत होता. जेव्हा हा पंख फैलावत होता, त्याची लांबी 7 फूट व्हायची, याच्या चोचेपासून पायापर्यंत हाडांची एक खास संरचना होती. तर तोंडात टोकदार दातांची साखळी होती.
या जीवाची पसंतीची शिकार ही सरडे किंवा छोट्या उंदरांसारख्या प्रजाती असायच्या. वैज्ञानिकांनी जर्मनीत उडणाऱ्या डायनासोरांच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांनी याचा जीवाश्म शोधला आहे. हा जीवाश्म पूर्णपणे संरक्षित असून यामुळे टेरोसॉर डायनासोरविषयी माहिती मिळत आहे.
ज्युरासिक काळाच्या अखेरीस होता हा पक्षी
या प्रजातीला स्किफोसुरा बावरिका नाव देण्यात आले आहे. या प्रजातीचा डायनासोर पक्षी ज्युरासिक काळाच्या अखेरच्या कालखंडात अस्तित्वात होते. हा लांब शेपूट असलेल्या छोट्या टेरोसॉरस डायनासोरांच्या शारीरिक बदलांनी युक्त प्रजाती होती. 8 कोटी वर्षांपूर्वी क्रेटासियस काळात क्वार्टझालाकोटलस नावाच्या जीवाचे हे पूर्वज ठरले. याचे पंख सध्याच्या एफ-16 लढाऊ विमानाइतके लांब होते.
टेरोसॉर पक्ष्यांची अधिक माहिती
लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीचे पुरातत्वतज्ञ डेव्हिड होन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण शोध असल्याचे म्हटले आहे. यासंबंधीचे अध्ययन करंट बायोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. स्किफोसुरा बावरिया आम्हाला टेरोसॉर पक्ष्यांविषयी अधिक माहिती प्रदान करत आहे. या पक्ष्याला स्वार्ड टेल ऑफ बावरिया नावाने देखील ओळखले जाते. याचे शपूट छोटे आणि टोकदार असायचे. याच्या जीवाश्माचा शोध 2015 मध्ये लागला होता, तेव्हापासून सातत्याने यावर अध्ययन केले जात होते. याच्या विचित्र संरचनेमुळे वैज्ञानिकांना मोठी मेहनत करावी लागली असल्याचे होन यांनी सांगितले.