For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नायजरमध्ये डायनासॉरसारख्या नव्या प्रजातीचा शोध

07:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
नायजरमध्ये डायनासॉरसारख्या नव्या प्रजातीचा शोध
Advertisement

उत्खननात मिळाले अवशेष

Advertisement

सहारा वाळवंटाच्या ठिकाणी कधीकाळी हिरवेगार जंगल, नद्या आणि सरोवरे होती. येथे शतकांपासून अनेक रहस्यं गाडलेली असून वेळोवेळी उत्खननादरम्यान ती बाहेर येत असतात. आता नायजरच्या मध्य सहारामध्ये लागलेल्या एका शोधाने पेलियोन्टोलॉजिस्टसना चकित केले आहे. येथे एका नव्या डायनासोरच्या प्रजातीचे अवशेष मिळाले असून याचे नाव स्पिनोसॉरस मिलाबिलिस आहे. या नावाचा अर्थ ‘आश्चर्यजनक स्पिनोसॉरस’ असा होतो.

अत्यंत नवी प्रजाती

Advertisement

ही 95 दशलक्ष वर्षे जुनी प्रजाती आहे आणि स्पिनोसॉरस जीनसची दुसरी ज्ञात  प्रजाती आहे. हा शोध युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या प्रसिद्ध पेलियोन्टोलॉजिस्ट पॉल सेरेनो यांच्या टीमने लावला आहे. जेंगुएबी नावाच्या एका ठिकाणी प्रथम डोक्याची क्रेस्ट मिळाली होती. परंतु टीमला हा सामान्य स्पिनोसॉरसचा हिस्सा असल्याचे वाटले होते. मग 2022 साली मोठ्या टीमसोबत पुन्हा उत्खनन झाले, ज्यात आणखी क्रेस्ट्स आणि हाडं मिळाली. वाळवंटात सोलर पॉवरद्वारे 3डी स्कल मॉडेल असेंबल करण्यात आले, जेव्हा लॅपटॉप स्क्रीनवर मॉडेल पूर्ण झाले, तेव्हा पूर्ण टीम स्तब्ध राहिली.

टीम अवाक्

हा क्षण अविस्मरणीय होता, क्रेस्ट अत्यंत उंच आणि तलवारीसारखा असल्याचे आम्ही पाहिले. ही पूर्ण नवी प्र्रजाती असल्याचे सेरेना यांनी म्हटले आहे. स्पिनोसॉरस मिराबिलिस स्कूलबसइतका (जवळपास 12-15 मीटर) लांब आणि  अनेक टन वजनी होता. याच्या शिरावर स्किमिटर-शेप्ड बोनी क्रेस्ट होते, जे जीवनात केराटिनने झाकलेले असल्यास आणखी लांब दिसत असेल. जबड्यात इंटरलॉकिंग टीथ होते, जे मासे पकडण्यासाठी योग्य होते. परंतु हा स्पिनोसॉरस समुद्र किनाऱ्यावर नव्हे तर इनलँड रिव्हर्स आणि फॉरेस्टेड एरियात रहायचा. फारक फॉर्मेशनच्या फ्लुवियल सेडिमेंट्सद्वारे हा वेटलँड्समध्ये वेडिंग (पाण्यात उभे राहून शिकार) करत होता असे कळते. हा शोध स्पिनोसॉरिड इवोल्युशनच्या थेअरीला मजबूत करतो.

Advertisement
Tags :

.