आर्युमान दुप्पट करण्याचा शोधला फॉर्म्युला
जपानचा इसम प्रतिदिन 30 मिनिटांची घेतो झोप
जपानच्या ह्योगो प्रांतात राहणाऱ्या डाइसुके होरी नावाचा इसम दिवसात केवळ 30 मिनिटांची झोप घेते. डाइसुके असे मागील 12 वर्षांपासून करत आहे. पेशाने व्यावसायिक असलेला 40 वर्षीय डाइसुक मागील 12 वर्षांपासून प्रतिदिन केवळ 30 मिनिटांची झोप घेत आहे.
स्वत:चे आर्युमान दुप्पट करण्यासाठी मी या दिनचर्येचे पालन करत आहे. स्वत:चे शरीर आणि मेंदूला अशाप्रकारे प्रशिक्षित केले आहे की केवळ 30 मिनिटांच्या झोपेनंतर माझे शरीर पुन्हा कामासाठी तयार होते. झोपेला 30 मिनिटांपर्यंत मर्यादित केल्याने माझ्या कार्यकुशलेत मोठी सुधारणा झाल्याचे होरीचे सांगणे आहे.
डाइसुके होरीने आरोग्य तज्ञांच्या मानवी शरीराला 6-8 तासांची झोप असल्याचे आवश्यक असल्याच्या थेअरीवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. केवळ 30 मिनिटे झोपणारा होरीने आपले शरीर किमान झोपसोबत सामान्य स्वरुपात काम करत असून यामुळे माझे शरीर आणि मेंदूवर नकारात्मकऐवजी सकारात्मक प्रभाव पडल्याचा दावा केला आहे.
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल आणि जेवण्याच्या एक तासापूर्वी कॉफी पित असाल तर तुम्हाला फायद होतो. ध्यान लावल्याने काम करण्यासाठी दीर्घ झोपेऐवजी चांगली गाढ झोप महत्त्वपूर्ण ठरते. ज्या लोकांना स्वत:च्या कामात निरंतर एकाग्रता हवी असते, त्यांनी दीर्घ झोपेच्या तुलनेत उच्च गुणवत्तायुक्त झोप घ्यावी असे होरीने सांगितले आहे.
होरीच्या केवळ 30 मिनिटे झोपण्याच्या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी जपानच्या योमीउरी टीव्हनी विल यू गो विथ मी नावाच्या एका रियलिटी शोमध्ये तीन दिवसांपर्यंत त्याच्यावर नजर ठेवली. शोमध्ये होरीने 26 मिनिटांची झोप घेतली आणि त्यानंत तो एकदम फ्रेश होऊन उठल्याचे दिसून आले. होरी जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनही चालवितात, जी त्यांनी 2016 मध्ये सुरू केली होती. या असोसिएशनच्या अंतर्गत ते झोप आणि आरोग्यावर प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी 2100 हून अधिक लोकांना अल्ट्रा शॉर्ट स्लीपर्स होण्याचे प्रशिक्षण दिले आहे.