कोयना धरणाचा विसर्ग आज वाढवणार
कोयनानगर :
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने मंगळवार 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणातून 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्याने कोयना धरणातून एकूण 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जाणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे कोयना सिंचन विभागा कडून कळविण्यात आले आहें.
मार्च महिना सुरु झाला तरी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात अद्याप 71 टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात 75.26 टीएमसी पाणीसाठा असून जलाशयातील पाण्याची पातळी 2135 फूट 10 इंच आहें. कोयना धरणातून सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही जनित्र सुरु असून त्यातून 2100 क्युसेक प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरु आहे. सद्या सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने मंगळवार 4 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणातून अतिरिक्त 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवीला जाणार असल्याने कोयना नदी पात्रात एकूण 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.