For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोयना धरणातून विसर्ग वाढवला

11:45 AM Jul 07, 2025 IST | Radhika Patil
कोयना धरणातून विसर्ग वाढवला
Advertisement

नवारस्ता :

Advertisement

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून कोयना धरणात प्रतिसेकंद २५ हजार ७७६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात झपाटयाने वाढ सुरू झाली आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्या पासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. जून महिन्यातच धरणाच्या पाणीसाठ्याने पन्नाशी ओलांडली. नुकताच पावसाळा सुरू झाला असल्याने आणि अद्यापही संपूर्ण चार महिने पावसाचे बाकी असताना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने होत असलेली वाढ नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी २० जून रोजी पायथा वीजगृहाचे एक युनिट कार्यान्वित करून त्यामधून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला असताना रविवारी सायंकाळी ६ वाजता पायथा विजगृहाचे दुसरेही युनिट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ही प्रशासनाने दिला आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे १२ (१९८६) मिलिमीटर, नवजा येथे ९ (१७८८) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे २३ (१८५८) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याने धरणात प्रतिसेकंद २५ हजार ७७६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून सायंकाळी पाचपर्यंत धर ६७.२० टीएमसी साठा झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.