For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय रिले संघाकडून निराशा

06:04 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय रिले संघाकडून निराशा
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या पुरूष आणि महिलांच्या रिले संघाकडून साफ निराशा झाली. 4×400 मी. रिले प्रकारात भारताच्या या दोन्ही संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नाही.

पुरूषांच्या 4×400 मी. रिले संघात मोहम्मद अनास याईया, मोहम्मद अजमल, अमोज जेकॉब आणि राजेश रमेश यांचा समावेश होता. पात्र फेरीच्या स्पर्धेत भारतीय पुरूष रिले संघाने 3 मिनीटे 0.58 सेकंदाचा व अवधी घेत दहावे स्थान मिळविले. पात्रफेरीनंतर अंतिम प्रवेश करणारे बोसवाना, ब्रिटन आणि अमेरिका हे संघ आघाडीवर आहेत. जपानला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 4×400 मी. रिले संघात विथीया रामराज, ज्योतिका श्रीदंडी, एम. आर. पुवम्मा आणि शुभा व्यंकटेशन यांचा समावेश होता. पात्र फेरीमध्ये भारतीय महिला संघ 15 व्या स्थानावर राहिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.