For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय मल्लांकडून निराशा

06:26 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय मल्लांकडून निराशा
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्तंबुल (तुर्की)

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय मल्लांनी पहिल्या दिवशी साफ निराशा केली. ग्रिकोरोमन पद्धतीमध्ये भारतीय मल्लांना सहा विविध वजन गटामध्ये हार पत्करावी लागली.

60 किलो वजन गटात सुमीत, 67 किलो वजन गटात आशु, 77 किलो गटात विकास, 87 किलो गटात सुनीलकुमार, 97 किलो वजन गटात नितेश आणि 130 किलो वजन गटात नवीन या भारतीय मल्लांना पहिल्या फेरीमध्ये प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement

60 किलो वजन गटातील सलामीच्या सामन्यात रोमानियाच्या रिझवानने सुमितचा 10-0, 67 किलो वजन गटात नॉर्वेच्या हेवार्द जे. ने आशुचा 5-4, 77 किलो गटात हंगेरीच्या वॅनकेझाने विकासचा, 87 किलो गटात अझरबेजानच्या रफिकने भारताच्या सुनीलकुमारचा 4-3 अशा गुणांनी पराभव केला. आता ग्रीकोरोमन पद्धतीच्या सहा विविध वजन गटात भारताच्या मल्लांना पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली असल्याने आता भारताला फ्रीस्टाईल प्रकारातील स्पर्धेवर अधिक भर द्यावा लागेल.

Advertisement
Tags :

.