कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Gokul News: गडहिंग्लजला गोकुळची उकळी, संचालकपदासाठी अनेकांच्या उड्या

05:45 PM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून ठराव वाढले
By : जगदीश पाटील
कोल्हापूरः गेल्या वेळच्या गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल अस्तित्वात आहे. या लढतीत मुश्रीफ-पाटील यांच्या पॅनेलने सत्तारूढ महाडिक पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडविले. 
या सत्तांतरात गडहिंग्लजची संचालक पदाची पाटी मात्र कोरी करकरीत राहिली. गडहिंग्लज येथून महाडिक आघाडीकडून सदानंद हत्तरकी, ‘गोडसाखर’चे व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्या विरोधात मुश्रीफ- पाटील आघाडीकडून कॉग्रेसचे विद्याधर गुरबे आणि राष्ट्रवादीचे महाबळेश्वर चौगुले रिंगणात आले होते. मुश्रीफ-पाटील आघाडी गोकुळच्या सत्तेत आली. पण, गुरबे, चौगुले यांना विजयापर्यंत पोहचता आले नाही.
जि. प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी येथील उमेदवारीसाठी जोराचे प्रयत्न केले होते. पहिल्यापासून त्यांचे नाव आघाडीवर होते. शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी नाकारली. मंत्री मुश्रीफ यांनी सतीश पाटील यांच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, गटा-तटाच्या जागा वाटपात ही जागा मंत्री मुश्रीफ यांना माजी आमदार राजेश पाटील यांना सोडावी लागली. याचा परिणामही काहीसा या निवडणुकीत झाल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तृळात झाली होती. यावेळी गोकुळचे वारे बदलले आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीत सहभागी होत गोकुळवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न राहील, असे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मुश्रीफ- पाटील ही आघाडी गोकुळमध्ये राहणार की नाही? असा प्रश्न चर्चेत आहे. असे झाल्यास गडहिंग्लजच्या उमेदवारीवरही मोठी खलबते होणार आहेत. मंत्री मुश्रीफ पुन्हा सतीश पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील राहतील, हे स्पष्ट आहे.

महायुती झाल्यास दुसरी जागा माजी आमदार राजेश पाटील यांच्या गटाला जाईल, असे संकेत आहेत. तसे झाल्यास पुन्हा महाबळेश्वर चौगुले रिंगणात असतील, अशी चर्चा आहे. पण कॉग्रेसची भूमिका कशीही राहिली तरी आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक विद्याधर गुरबे यांना गडहिंग्लज तालुक्यातून रिंगणात उतरवले जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यावर येथील हालचाली अधिक गतीमान होतील. पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत गोकुळच्या संचालक मंडळात गडहिंग्लजची जागा भरली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे

Advertisement

‘क्रॉस व्होटींग’मुळे पाटी कोरी

Advertisement

गेल्या निवडणुकीत गडहिंग्लज, चंदगड या दोन्ही तालुक्याची संचालकपदाची पाटी ‘क्रॉस व्होटींग’मुळे कोरी राहिली हे निकालवरून उघड झाले. मुश्रीफ-पाटील आघाडीकडून रिंगणात असणारे गडहिंग्लज तालुक्यातील विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगुले, चंदगड तालुक्यातून सुश्मिता पाटील यांना आघाडीची सत्ता येऊनही पराभव पत्करावा लागला. महाडिक आघाडीचीही अशीच अवस्था होती.
या आघाडीकडून रिंगणात असणारे गडहिंग्लज तालुक्यातील प्रकाश चव्हाण, सदानंद हत्तरकी, चंदगड तालुक्यातून दीपक पाटील यांचा पराभव झाला. आजऱ्यातून रविंद्र आपटे यांचा पराभव झाला पण याच
तालुक्यातील मुश्रीफ-पाटील आघाडीच्या अंजना रेडेकर या एकमेव उमेदवार या तीन तालुक्यातून विजयी झाल्या.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून ठराव वाढले

गोकुळच्या ठरावधारकांत करवीर, राधानगरीचा वरचष्मा होता. त्यामुळे त्या भागातील सभासद ठरवून आपल्या तालुक्याला गोकुळचे अधिक प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ‘क्रॉस व्होटींग’ केले जात होते. याचा फटका नेहमीच गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्याला बसत आला आहे. यावेळी मात्र या तिन्ही तालुक्याची सभासद संख्या वाढलीय.

गडहिंग्लजला 402, चंदगडला 426 आणि आजऱ्या 308 अशी सभासद संख्या झाली आहे. त्यामुळे गडहिंग्लज उपविभागातील सभासदांनी आपली एकजुट दाखवत गडहिंग्लज, चंदगड तालुक्याची पाटी कोरी राहणार नाही
यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
Advertisement
Tags :
@BJP_NEWS@kolhapur# tarun bharat news # congress # satej patil ###tarunbharat##tarunbharatnews#ajara#crossvoting#gadhinglaj#Gokul milk#GOKULMILK#hasanmushrif#Mahavikas Aghadi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#tbdGokulElectionnewsChandgarh
Next Article