Kolhapur Police : जिल्ह्यातील 17 जणांना पोलीस महासंचालक पदक, महाराष्ट्र दिनी होणार गौरव
कोल्हापुरातील 8 अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश
कोल्हापूर : सेवेत उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकपद जाहीर झाले आहे. यामध्ये कोल्हापुरातील 8 अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी राज्यातील 800 पोलिसांना पदक जाहीर केले.
यामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक मनिषा भीमराव दुबुले, पोलीस निरीक्षक संजीवकुमार दत्तात्रय झाडे, पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणीस, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव, नरसू भारमाना गावडे, महादेव नारायण कुराडे, अनिल संभाजी जाधव, जनार्दन शिवाजी खाडे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस हवालदार संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगुले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, रमेश श्रीपती कांबळे, युवराज भिवाजी पाटील, पोलीस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील अशी पदक प्राप्त अंमलदारांची नावे आहेत. गुरुवारी महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.