'भेरा ' चित्रपटाच्या दिग्दर्शक ,कलाकारांची 'लोकमान्य' ला भेट
12:33 PM Mar 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी
Advertisement
अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त 'भेरा ' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे , अभिनेता दीपक जोईल, आणि प्रमोद कोयंडे यांनी सावंतवाडी येथील लोकमान्य मल्टीपर्पज को . ऑपरेटिव्ह सोसायटीच्या क्षेत्रीय कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली .यावेळी सोसायटीच्यावतीने क्षेत्रीय व्यवस्थापक बी. एन. पांडव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमान्य सोसायटीचे महेश तानावडे , शशांक विचारे, मयूर पिंगुळकर, मुरारी वालावलकर, अर्चना सरनाईक, साक्षी मयेकर, श्रुती राऊळ, श्रेया पास्ते, अंकिता पेडणेकर, श्रावण धोंड, जानू पाटील, अजिंक्य नारळीकर, दिव्येश बिरोडकर, संग्रामसिंह चव्हाण, संदीप पाटील ,प्रसाद वेंगुर्लेकर, अमित रानडे, आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement