थेट अहमदाबाद येथून
सुरवातीस दक्षिण आफ्रिका कर्णधार एडन मार्क्ररमने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. भारताने संघात काहीही बदल केला नाही. आज अहमदाबाद येथील हवामान तुलनेने सुखद होते. तापमान 30 अंशाखाली व हवेत कमी बाष्फ असल्याने क्रिकेटसाठी पोषक वातावरण होते.
प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला दिसला. सुरवातीपासुनच स्टेडीयम खचाखच भरल्याचे पाहायला मिळाले. 5 व्या क्रमांच्या काळ्या मातीच्या खेळपट्टीवर सामना खेळला गेला.बुमराहने दुसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकची उजवी यष्टी हवेत उंच उडविली. जोरदार आउट स्विंगचा अंदाज न आल्याने डिकॉक संघाच्या 10 धावा असताना 6 वर बाद झाला.पाठोपाठ अर्शदीपसिंगने एका धिम्या चेंडूवर मार्करमला पांड्या कडवी झेलबाद करून दक्षिण आफिकेचे 2 बाद 13 अशी खराब खेळी केली.
हे कमीच, बुमराहने तर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. रायन रिकल्टनला दुबेने मिड ऑनला सुरेख टिपले. आफ्रिका 3 बाद 20.
पहिल्या पॉवरप्ले अखेर आफ्रिका संघ 41 धावा जोडू शकला.
मिलरने जबादारीने पण आक्रमक खेळ करून धावफलक हलता ठेवण्याची काळजी घेतली.डावाच्या मध्यावर म्हणजे 10 षटकानंतर आफ्रिका 3 बाद 77 अशा समाधानकारक स्थितीत पोचल्याचे चित्र दिसले.
दुबेने स्थिर झालेल्या ब्रेवीसची 45 धावांची उपयुक्त खेळी संपुष्टात आणली.
मिलरने आक्रमक खेळी करत 26 चेंडूत 6चौकार व 3 षटकारासह दमदार अर्धशतक साजरे केले.14 षटकानंतर आफ्रिका संघ 4 बाद 134 अश्या सुस्थितीत असल्याचे दिसून आले.अखेर वरुण चक्रवर्तीने मिलरची 63 धावांची खेळी संपुष्टात आणली. तिलक वर्माने मिड ऑफला सुरेख झेल घेतला.
शेवटी दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 187 धावा करून भारतासमोर काहीसे आव्हानात्मक लक्ष ठेवले.भारताकडून अर्शदीप 2 बळी बुमराह 3 व चक्रवर्ती 1, दुबे 1 यांनी टिच्चून गोलंदाजी केली. परंतु शेवटच्या 4 षटकात आफ्रिका संघ भरपूर धावा लुटण्यात यशस्वी झाला असे म्हणावे लागेल.
उदय बिनीवाले.