For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा 18.38 लाख कोटीवर

06:20 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा  18 38 लाख कोटीवर
Advertisement

10 फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी : मागील वर्षाच्या तुलनेत 2.71 लाख कोटीने अधिक : 2.77 लाख कोटीचा परतावा जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे जारी केले आहेत. या आकडेवारीनुसार सरकारने चालू आर्थिक वर्षात (2023-24) मध्ये 10 फेब्रुवारीपर्यंत 18.38 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर वसूल केला आहे.

Advertisement

10 फेब्रुवारी 2024 पर्यंतचे हे संकलन मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.71 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सरकारने 15.67 लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर प्राप्त केला होता.

चालू आर्थिक वर्षातील करसंकलनाच्या सुधारित लक्ष्याच्या तुलनेत 80.23 टक्के प्रत्यक्ष कर वसूल झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य 18.23 लाख कोटी रुपयांवरून वाढवत 19.45 लाख कोटी रुपये केले हेते.

परताव्यानंतर करसंकलन 15.60 लाख कोटी

परतावा सोडून निव्वळ कर संकलन मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.25 टक्क्यांनी वाढून 15.60 लाख कोटी रुपये राहिले आहे. सरकारने 1 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान 2.77 लाख कोटी रुपयांचा कर परतावा देखील जारी केला आहे. मागील महिन्यात म्हणजेच 11 जानेवारीपर्यंत 14.70 लाख कोटी रुपयांचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन केले होते.

वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात वाढ

परताव्यानंतर निव्वळ कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनात वार्षिक आधारावर 13.57 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर निव्वळ वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात मागील वर्षाच्या तुलनेत 26.91 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.