कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरात जलोत्सव...बावड्यात जल्लोष!

02:36 PM Nov 11, 2023 IST | Abhijeet Khandekar
Kasba Bawa
Advertisement

कसबा बावडा

कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईने पिण्याचे पाणी आणण्याचे कोल्हापूरकरांचे अनेक दशकांचे स्वप्न अखेर साकार झाले. या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सतेज पाटील यांनी काल 11वाजता जलपूजन करून दिपावली दिवशी पाणी शहरात आणण्याचा मार्ग मोकळा केला. कसबा बावड्याची अस्मिता समजले जाणारे बंटी पाटील यांच्या हस्ते जलपूजन झाल्याची बातमी कळताच बावड्यात एकच सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Advertisement

गेली 9 वर्षा पासून अनेक अडथळे आणि समस्यांशी टक्कर देत असलेली काळम्मावा़डी थेट पाईपलाईन आज अखेर सुरु झाली. 2014 च्या कोल्हापूर महापालिका निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी थेट पाइपलाईन योजनेला मंजूरी आणणारच अशी घोषणा करून असे जर झाले नाही तर मी आमदारकी लढवणार नाही, अशी भिष्म प्रतिज्ञा केली. आमदार सतेज पाटील यांनी आपल्या प्रयत्नाने 488 कोटी निधी मंजूर करून आणला. यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचीही मदत झाली.

Advertisement

जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी थेटपाईपलाईन योजना व्हावी यासाठी प्रयत्न केले असले तरी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या योजनेचा विषेश पाठपुरावा केला. या योजनेसाठी सतेज पाटील यांनी जातीने लक्ष घालून वेळोवेळी आढावा घेतला. त्यांनी धरणक्षेत्रातील कामाच्या ठिकाणी वेळोवेळी जावून अडचणी समजाऊन घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. सतेज पाटील यांच्या प्रयत्नांनीच हि योजना पुर्ण होऊ शकली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

गेल्या 9 वर्षात या कोल्हापूरच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. थेट समस्याला अनेक अडचणींचे ग्रहण लागले. काही गावात या योजनेला विरोध झाला. त्यानंतर आलेल्या कोरोना काळात तर काम पुर्णपणे ठप्प झाले. आमदार सतेज पाटील यांच्यावर राजकिय टिकाही झाल्य़ा. 'हि थेट पाईपलाईन नसून लेट पाईपलाईन आहे' असेही विरोधकांनी म्हटले. दिवाळीला अभ्यंगस्नान कधी करायला मिळणार असेही बोलले गेले.

या योजनेच्या श्रेयवादावरूनही अनेक वेळा राजकारण तापले. हि योजना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केली असल्यानी आम्ही त्यांच्याच हस्ते उद्घाटन करणार असे राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी निधी दिला असून यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार असे शिवसेना शिंदे गटाने सांगितले. पण काल रात्री सतेज पाटील यांनी काळम्मावाडी येथे जाऊन जलपूजन करून शहराला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा केला.

थेट पाईप लाईनचे पाणी शुक्रवारी कोल्हापूर शहरात आल्याचे समजताच कसबा बावड्यात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याचे स्वप्न आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्याने कसबा बावड्यातील नागरिकांनी शुक्रवारी रात्री फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. दरम्यान, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील कसबा बावड्यात येताच बावडेकरांनी त्यांना खांद्यावर उचलून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, गजानन बेडेकर, हेमंत उलपे, प्रदीप उलपे, प्रसाद वराळे, रुपेश पाटील, धनाजी गोडसे, युवराज उलपे, उत्तम कामीरकर आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
Direct Pipelinejubilation Kasba BawadaKasba Bawadareached Kolhapur citytarun bharat news
Next Article