For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थेट पाईपलाईन संदर्भात कोणीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नयेः अमल महाडिक

04:54 PM Jan 31, 2025 IST | Pooja Marathe
थेट पाईपलाईन संदर्भात कोणीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नयेः अमल महाडिक
Advertisement

कोल्हापूर
मी निवडून आल्यापासून सातत्याने माझा पाठपुरावा आहे. थेटपाईप लाईन संदर्भात राज्यसरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे. येणाऱ्या आठ दिवसात लोकांना मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. थेटपाईन लाईनच्या गळतीमुळे लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मी प्रशासनातर्फे एक लोकप्रतिनिधी म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया आमदार अमल महाडीक यांनी कोल्हापूरातील थेट पाईपलाईन संदर्भात दिली.
पुढे कोल्हापूर हद्दवाढीबद्दल बोलताना आमदार महाडिक म्हणाले, महायुतीचे दहा ही आमदार निर्णय घेण्यास सक्षम आहोत. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा यातून चांगला मध्यम असा मार्ग काढला पाहिजे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या पुढे हे प्रश्न मांडू आणि यातून योग्य तो मार्ग काढू. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा यावर योग्य मार्ग काढू. हद्दवाढी संदर्भात नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करू. हद्दवाढीसंदर्भात प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आणि ठाम आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलावले जाईल. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी निर्णय घेऊ.

Advertisement

Advertisement
Tags :

.