Chaloba Hill | तुडये-हाजगोळी परिसरात पर्यटकांना थेट नो-एन्ट्री! ग्रामसभेत घेतला 'हा' ऐतिहासिक आणि कठोर निर्णय!
चाळोबा टेकडीवर पर्यटकांना बंदी; ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय
तुडये -हाजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा देवालय टेकडी परिसरात वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे निर्माण होत असलेल्या विविध समस्यांबर अखेर ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेतली आहे. पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी, मद्यप्राशन, तिलारी धरणाच्या खोल पाण्यात पोहण्यासाठी होणारी जीवघेणी गर्दी, महिलांची छेडछाड तसेच वारंवार घडणाऱ्या बुडून मृत्यूच्या घटनांचा गांभिर्यान विचार करून चाळोबा टेकडी परिसरात पर्यटकांना बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णयहाजगोळी येथे ग्रामसभेत सहभागी ग्रामस्थ,विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. सरपंच शितल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय झाला.
बेळगाव शहर व उपनगरांतील मोठ्या संख्येने पर्यटक विशेषतः मंगळवार आणि रविवारच्यासुट्टीच्या दिवशी अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील चाळोबा टेकडी परिसरात सहली व पार्थ्यांसाठी येत असतात. मात्र, या पर्यटकांकडून मद्यप्राशन करून नशेत धिंगाणा घालणे, ग्रामस्थांशी वादविवाद करणे, मारामाऱ्याकरणे आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे हे प्रकार नित्याचे झाले होते. मद्यधुंद अवस्थेत रिकाम्या बाटल्या फोडल्याने परिसरात सर्वत्र काचेचे तुकडे पसरले असून निसर्गरम्य वातावरणाचे विद्रुपीकरण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
चाळोबा टेकडीच्या सभोवती असलेल्या तिलारी धरणाच्या २५ ते ५० फूट खोल पाण्यात जीवाची पर्वा न करता जलक्रीडा करण्यासाठी उतरल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत या परिसरात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या अर्धशतकाच्या घरात पोहोचल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. तरीही पर्यटकांची गर्दी कमी होत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
याशिवाय गावातील शेताकडे जाणाऱ्या महिला व युवतींची दुचाकीवरून वेगाने जाताना छेडछाड केल्याच्या घटनाही वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर गावचा शांतताप्रिय व निसर्गसंपन्न परिसर जपण्यासाठी पर्यटकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.मद्यधुंद पर्यटकांकडून दगडफेक, दोन युवकांना ग्रामस्थांचा चोप दरम्यान, रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने ग्रामस्थांचा संताप अधिक वाढला. शनिवारी चाळोबा टेकडी परिसरात गणेशपूर (बेळगाव) येथील ओमकार नामदेव पाटील (वय २२) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी सुट्टीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास चार दुचाकींवरून आलेले आठ युवक गावातून भरधाव वेगानेजात होते.
ग्रामस्थांनी त्यांना सावकाश जाण्याचा सल्ला दिला असता, संबंधित युवकांनी उलट ग्रामस्थांशी वाद घालून हाणामारी सुरू केली. मद्यधुंद अवस्थेतील या युवकांनी शिवीगाळ करत दगडफेकही केल्याचे सांगण्यात आले.यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दोघा युवकांना पकडून चोप दिला, तर इतर सहा युवक घटनास्थळावरून पसार झाले.