मोपावरुन थेट कुवेत,अबुधाबी विमानसेवा
12:22 PM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आता थेट कुवेत आणि अबुधाबीपर्यंत विमानसेवा सुरू होत आहे. एअर इंडियाने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार कुवेतला जाणारे पहिले विमान दि. 3 मे रोजी निघेल, तर अबुधाबीला जाणारे थेट विमान दि. 5 मे रोजी मोपावरुन निघेल. या दोन विमानांमुळे गोव्यातील प्रवाशांची फार मोठी सोय होणार आहे. विशेषत: उत्तर गोव्यातील प्रवाशांकरीता ही सुवर्णसंधी आहे.
Advertisement
Advertisement