कसबा बीड मधील श्री महादेव मंदिरमध्ये उत्साहात दिपोत्सव साजरा
01:16 PM Nov 28, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
कसबा बीड प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे कसबा बीड येथे त्रिपुरारी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुदर्शीचे औचित्य साधून यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीडच्या माध्यमातून कसबा बीड गावाचे ग्रामदैवत श्री बीडेश्वर महादेव मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.
Advertisement
यावेळी सुमारे ११०० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसेच महात्मा जोतिबा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करणारी व त्यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी सुबक रांगोळी साकारण्यात आली होती. कसबा बीडच्या ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी विशेषतः महिला वर्गाने या दिपोत्सवास भेट देत त्याचा आनंद घेतला. एकूणच हजारो दिवे, आकर्षक रांगोळी आणि लोकांचा सहभाग यांमुळे मंदिराचा परिसर चैतन्यमय बनला होता. यावेळी गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement