वेंगुर्ले येथील हनुमान मंदिरात दिपोत्सव साजरा
यशस्वी चांद्रयान मोहीमेचा दिपोत्सवातून गौरव
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहर मारुती स्टॉप येथील पुरातन मारुती मंदिर मध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा (१,१११) पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दिपोत्सवाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे हस्ते झाले. या दिपोत्सवास शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट देवून हनुमान मंदिर सेवान्यास वेंगुर्लेचा गौरव केला.
संपूर्ण जगात भारताचे नाव चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेने गौरविण्यात आले. या गौरवशाली परंपरेस व शास्त्रज्ञाच्या संशोधनाला सलाम करण्यासाठी ११११ पणत्या लावून भारताचा गौरवशाली परंपरेस आगळावेगळा सलाम करण्यात आला. हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत शिवसेनेच जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम तालुका संघटक बाळा दळवी, तसेच मितेश परब, युवा शहर प्रमुख संतोष पर महिला शहर प्रमुख अँड श्रध्दा बावीस्कर, महिला संघटक रसिका राऊळ, मनाली परब, अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख, हनुमान मंदिर सेवा न्यासचे अजय खानोलकर, शैलेश केसरकर, प्रशांत निकम, महेश मयेकर, अथर्व नार्वेकर, प्रसाद जोशी, गौरव खानोलकर, पंकज शिरसाट, गौतम गाडेकर, सिमा नाईक, यश कुबल, किशोर सोन्सुरकर यासह महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.