डायनासोर : सांगाड्याचा होणार लिलाव
किंमत ऐकून बसेल धक्का
फ्रेंच ऑक्शन हाउस कॉलिन डु बोकेज आणि बारबारोसा यांनी डायनासोरच्या सांगाड्याच्या लिलावाची घोषणा केली आहे. लिलाव होणारा डायनासोरचा सांगाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि पूर्ण सांगाडा आहे. याची किंमत जुलैमध्ये नोंदणीपूर्व बोली सुरू झाल्यापासूनच मूळ अनुमानाला ओलांडत 11-22 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 92-185 कोटी रुपये) झाली आहे. एपेटोसॉरस सांगाड्याचा शोध 2018 मध्ये अमेरिकेच्या व्योमिंगमध्ये लावण्यात आला होता आणि याची लांबी 20.50 मीटर आहे. यात सुमारे 80 टक्के हाडं त्याच डायनसोरची आहेत. याचमुळे याला आतापर्यंतचा शोधण्यात आलेला सर्वात पूर्ण डायनासोरचा सांगडा मानले जात आहे. कोलिन डु बोकेजचे संस्थापक आणि लिलावकर्ते ओलिवियर कोलिन डु बोकेज यांनी हा जीवभरातील सर्वात जुना शोध असल्याचे म्हणत वल्केन सर्वात मोठा आणि आतापर्यंतचा सर्वात अधिक पूर्ण डायनासोरचा सांगाडा असल्याचे वक्तव्य केले आहे.
यापूर्वीही विक्री
1997 मध्ये टी-रेक्स सू की याची 8.4 दशलक्ष डॉलर्समध्ये विक्री झाली होती. तर चालू वर्षाच्या प्रारंभी एपेक्स स्टेगोसॉरसची 44.6 दशलक्ष डॉलर्समध्ये विक्रमी विक्री झाल्यावर डायनासोरच्या सांगाड्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. वल्केनची विक्री गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची अपेक्षा आहे.
डायनासोरचे वैशिष्dयाट
याचे अध्ययन जर्मनीच्या रोस्टॉक विद्यापीठाचे क्रिश्चियन फोथ समवेत प्रसिद्ध जीवाश्मशास्त्र तज्ञांकडून करण्यात आले. त्यांनी अलिकडेच नमुन्याला एक नव्या डायनासोर प्रजातीच्या स्वरुपात शोधले. त्यांच्या विश्लेषणानुसार वल्केन डायनासोरमध्ये एपेटोसॉरस आणि ब्रेंटोसॉरस दोन्हींसाठी समान वैशिष्ट्यो आहेत. परंतु एपेटोसॉरस अजाक्सशी अधिक जवळीक साधणारा आहे, तर एपेटोसॉरसची अन्य मान्यताप्राप्त प्रजाती एपेटोसॉरस लुईसेसोबत वैशिष्ट्यो शेअर करत आहे.
दोन प्रजातींमधील दुवा
अशाप्रकारच्या वैशिष्ट्यांचे हे अनोखे मिश्रण वल्केन एपेटोसॉरस अजाक्स आणि एपेटोसॉरस लुईसेदरम्यान दुवा प्रजातीचे प्रतिनिधित्व करू शकते. जीवाश्म मातीच्या थरांमध्ये आढळणाऱ्या पदार्थाच्या आधारावर याला शाकाहारीच्या स्वऊपात वर्गीकृत करण्यात आले.
80 टक्क्यांपंर्यंत एकाच शरीराची हाडं
न्यूयॉर्कच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये प्रदर्शित अपाटोसॉरसचे मॉडल तीन वेगवेगळ्या डायनासोरांच्या सांगाड्यांनी निर्माण करण्यात आले आहे. तर वल्केन 80 टक्के पूर्ण डायनासोर असून यात कवटी आणि गॅस्ट्रालियाचा देखील एक हिस्सा आहे. जो दुर्लभ घटक असून तो बहुतांश नमुन्यांमध्ये अनुपस्थित आहे. 16 नोव्हेंबर रोजी लिलावाची अंतिम बोली लागल्यावर वल्केन कुठे जाणार यावरून संबंधित वर्तुळात चर्चा सुरू आहे. विशाल अमेरिकन डायनासोरला पॅरिसबाहेर शैटॉ डे डॅम्पियर-एन-यवेलिन्समध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
खरेदीदाराला मिळणार बरेच काही
संबंधित खरेदीदाराला जीपीएस पॉइंट आणि उत्खनन योजनेसोबत एक ऑस्टियोलॉजिकल मानचित्र आणि डायनसोरचे नाव अधिकृतपणे बदलण्याचा अधिकार आणि नमुन्याचे कॉपीराइट दिले जाणार आहेत. वल्केन हा लेट ज्युरासिक मॉरिसन फॉर्मेशनच्या सर्वात पूर्ण सॉरोपॉड जीवाश्मांपैकी एक आहे.