For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डायनिंग विथ द कपूर्स’ माहितीपट येतोय

06:15 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘डायनिंग विथ द कपूर्स’ माहितीपट येतोय
Advertisement

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध फिल्मी परिवारापैकी एक कपूर घराणे आता स्वत:चे जीवन, नात्यांशी निगडित काही आठवणींसह पडद्यावर येणार आहे. नेटफ्लिक्सने स्वत:चा नवा माहितीपट ‘डायनिंग विथ द कपूर्स’चे पोस्टर जारी केले आहे. हा माहितीपट 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटात प्रेक्षकांना कपूर घराण्याच्या ची झलक पाहता येणार आहे. कपूर परिवाराने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक पिढ्यांपर्यंत दिशा दिली आणि याचे मूळ पृथ्वीराज कपूरपासून रणवीर कपूरपर्यंत फैलावलेले आहे. माहितीपटात चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला पारिवारिक परंपरांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहितीपटात राज कपूरच्या काळापासून आजच्या पिढीपर्यंत कहाणी असेल. माहितीपटात परिवाराचे अनेक सदस्य एकत्र दिसून येतील. रणवीर, करीना, करिश्मा, रिद्धिमा कपूर साहनी, आदर जैन, अरमान जैन, जहान कपूर, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा सर्व युवा पिढीचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील. रणधीर कपूर, बबिता कपूर आणि नीत कपूर देखील हिस्सा आहेत. परिवाराचे अन्य सदस्यही ज्यात सैफ अली खान, भरत साहनी, मनोज जैन, निताशा नंदा, कुणाल कपूर, शायरा कपूर, नीला कपूर, जतिन पृथ्वीराज कपूर, कंचन देसाई, नमिता कपूर आणि पूजा देसाई दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.