नव्या वर्षाच्या प्रारंभी 'दिलजीत'ने घेतली 'पंतप्रधानां'ची भेट
भेटीचा खास व्हिडीओ, फोटोज चाहत्यांसोबत केले शेअर
दिल्ली
पंजाबी गायक 'दिलजीत दोसांझ'ने नववर्षाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने केली. सोशल मीडियावर जाऊन पंतप्रधानांशी झालेल्या भेटीची झलक पोस्ट केली. पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी बुधवारी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.या भेटीत दिलजीतने पंतप्रधानांशी भारताची विशालता, विविधता, संस्कृती या विषयांवर चर्चा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी एका गाण्याची झलक गाऊन दाखविली. दिलीजीत च्या गाण्याचा आस्वाद घेताना पंतप्रधान मोदी या व्हीडीओमध्ये दिसत आहेत.
अलीकडेच दिलजीत दोसांझ यांने आपल्या अनेक महिन्यांच्या संपूर्ण भारत दिल-लुमिनाटी दौऱ्याची सांगता केली.
“२०२५ ची एक विलक्षण सुरुवात. पंतप्रधानजी यांच्यासोबतची एक संस्मरणीय भेट. आम्ही अर्थातच संगीतासह बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो!” अशी पोस्ट लिहीत दिलजीतने या भेटीचा व्हीडीओ आणि फोटो त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलजीतने या भेटीची जी पोस्ट एक्स वर केली आहे, त्यावर प्रतिसाद देत लिहीले, “दिलजीत दोसांझसोबत एक उत्तम संवाद! तो खरोखरच बहुआयामी, प्रतिभा आणि परंपरा यांचे मिश्रण करणारा कलाकार आहे. आम्ही संगीत, संस्कृती आणि बरेच काही यावर जोडलेलो आहोत..”