For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मानलं राव! पराभवानंतरही दिलीप घुगे यांनी केले विजयी प्रतापसिंह पाटील यांचे कौतुक; सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

04:14 PM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मानलं राव  पराभवानंतरही दिलीप घुगे यांनी केले विजयी प्रतापसिंह पाटील यांचे कौतुक  सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा
Advertisement
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत विजय आणि पराभव होत असला, तरी राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या यशाचे मनापासून कौतुक करण्याची वृत्तीही पाहायला मिळते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी विजयी उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. घुगे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विजयामागील नियोजनाचे केले कौतुक

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिलीप घुगे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील हे एकमेकांविरोधात मैदानात होते. या निवडणुकीत पाटील यांनी विजय मिळवला, तर घुगे यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, निकालानंतर घुगे यांनी प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचे कौतुक करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

Advertisement

घुगे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, “डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्यासारखा पदवीधर आमदार होण्यासाठी, डॉ. राहुल पाटील यांच्यासारखा चाणक्य, परफेक्ट नियोजन करणारा पाठीराखा भाऊ असावा लागतो.”

या शब्दांत त्यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील नियोजनाचे आणि डॉ. राहुल पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

Advertisement

राजकीय संघर्षानंतरही खिलाडूवृत्ती

निवडणुकीच्या काळात उमेदवारांमध्ये राजकीय स्पर्धा आणि आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, निकालानंतर प्रतिस्पर्ध्याच्या यशाची दखल घेणे हे राजकीय परिपक्वतेचे उदाहरण मानले जाते. दिलीप घुगे यांच्या पोस्टमधूनही अशीच भावना व्यक्त झाल्याचे दिसून येत आहे.

पराभवानंतरही विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून त्यांच्या यशामागील नियोजनाची प्रशंसा केल्याने घुगे यांच्या भूमिकेची चर्चा होत आहे. त्यांच्या या पोस्टने निवडणुकीच्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement

.