For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांची फेरनिवड

01:04 PM Jan 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांची फेरनिवड
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये महाराष्ट्रा परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली दिलीप भालेकर यांची परीट समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक कदम, रायगड जिल्हाध्यक्ष विलास तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी परीट समाजाची जिल्हा कार्यकारणी गठित करून सर्व तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर (सावंतवाडी), जिल्हाउपाध्यक्ष - किरण चव्हाण (मालवण), विलास साळसकर (देवगड), प्रसाद पाटकर (वेंगुर्ला), नागेश कुडाळकर (कुडाळ), धनश्री चव्हाण (कणकवली), तातु कडु (वैभववाडी), जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर (सावंतवाडी), सहचिटणीस अनिल शिवडावकर (कुडाळ), जिल्हा खजिनदार रितेश चव्हाण (सावंतवाडी), सहखजिनदार अशोक आरोलकर (वेंगुर्ला), जिल्हासदस्य - संदिप बांदेकर, संदिप कडु, गुरुनाथ मडवळ, विनायक चव्हाण, किरण कुणकेश्वरकर, अशोक पोखरणकर, भालचंद्र करंजेकर, तालुकाध्यक्ष - राजेंद्र भालेकर (सावंतवाडी), श्रीकृष्ण परीट (दोडामार्ग), महेंद्र आरोलकर (वेंगुर्ला), सदानंद अनावकर (कुडाळ), मोहन वालकर (मालवण), रामचंद्र कामतेकर (कणकवली), विजय पाटील (देवगड), शेखर कडु (वैभववाडी), सावंतवाडी शहराध्यक्ष दयानंद रेडकर, अशा प्रकारे जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांनी सर्व जिल्हा कार्यकारणीचे व तालुकाध्यक्षांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून माझी जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झाली तसेच आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे व मी संघटना अधिक मजबूत करेन तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करेन असे आश्वासन दिले.यावेळी 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा जयंती, 4 मे रोजी परीट समाजाचा कोकण विभागीय स्नेह मेळावा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,गोवा व बेळगाव वधुवर मेळावा आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप भालेकर यांनी तर स्वागत राजू भालेकर व आभार जितेंद्र मोरजकर यांनी मानले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाजातील सर्व बंधू भगिनी उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :

.