महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सातारा आगारातच खड्डेच खड्डे..! बसचा होतोय खुळाखुळा, कचरा ठेवला जातोय साठवून

01:05 PM Jul 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Satara depot
Advertisement

प्रवाशांचा अपमान करणारे चित्र अजूनही भिंतीवर

सातारा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची दुरावस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चून चार वर्षापुर्वी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र, काँक्रीटीकरणातील काँक्रिट आणि सिमेंट गायब होवून खड्डेच खड्डे पडत आहेत. त्यामुळे एसटी बसचा आगारातच खूळखुळा होत आहे. विशेष म्हणजे आगारात दररोज तयार होणारा कचरा हा कोपऱ्यात साठवला जातोय. तसेच इमारत जुनी झाली असून पावसाळा आला की कावळयाच्या घरासारखी नवीन इमारत असावी अशी एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही आठवण होते. छताचा भाग पडून प्रवाशांचा जीव जाण्याची प्रतिक्षा प्रशासन करते काय असाही सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

सातारा आगार हा जिह्याचा महत्वाचा आगार समजला जातो. त्याचबरोबर राज्य व परराज्यातील बसेस सुद्धा या आगारात येत असतात. परंतु या आगाराला उर्जितावस्था येण्याऐवजी या आगाराची दिवसेंदिवस दुरावस्था होत आहे. आगारात गेल्या चार वर्षापूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्याकरता लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु त्यानंतर आता आगारात चित्र पाहिले तर पुणे, मुंबईच्या फलाटाकडे खड्डे पडलेले आहेत. स्वच्छतागृहाच्या पाठीमागे व कराड पाटण बाजूच्या फलाटाकडेही खड्डे पडलेले आहेत. पाठीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या दरम्यान, पडलेले खड्डे केमिकल मिश्रणाने भरण्यात आले होते. तेही टिकले नाहीत. आता या बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यामुळे बसेसचा खुळखुळा होत आहे. त्याच बरोबर इनगेट आणि आऊटगेटच्या प्रवेशद्वारावर मोठाले स्पीडब्रेकर केले गेले आहेत. त्यामुळे बसेसचे पाटे तुटण्याची भीती आहे. तसेच इमारती तर जुनीच आहे. पावसाळयात इमारतीच्या टेरेसवरुन पाणी गळते. तेव्हा कर्मचाऱ्यांना नवीन इमारत असायला हवी अशी आठवण होते. दरम्यान, सातारा आगारातील कचरा एका कोपऱ्यात साठवून ठेवण्यात येतो. यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे सातारा आगारातील प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

आगारात प्रवाशांचा अपमान करणारे चित्र
एसटीमध्ये प्रवाशी प्रवास करतात. परंतु सातारा आगारात असे एक चित्र गेल्या एक महिन्यापासून झळकत आहे. त्यात एसटीमध्ये चक्क जनावरे प्रवास करत आहेत असे दाखवण्यात आले आहे. हे चित्र बदलले गेले नाही. त्यामुळे सातारा आगारात प्रवाशांचाच अपमान होत आहे. पेंटर सुद्धा त्यात दुरुस्ती करत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :
Maharashtra State Transport CorporationSatara depot
Next Article