अनगोळ लक्ष्मी मंदिर कमिटीतर्फे मान्यवरांचा सत्कार
बेळगाव : अनगोळ ग्रामस्थ व ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिर बांधकाम ट्रस्ट कमिटीच्यावतीने नुकताच श्री महालक्ष्मी मंदिर येथे अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. अनगोळ गावातील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उदय सायनाक, गावातील सामाजिक कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर यल्लाप्पा कांबळे तसेच वडगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक स्चेप्पर बांधकाम उद्योजक आणि डेव्हलपर्सचे संचालक विनायक जांबोटकर यांचा लक्ष्मी मंदिर बांधकाम कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. अनगोळ येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक निधी ग्रुप कन्स्ट्रक्शनचे प्रमुख बेळगावमध्ये बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. याची दखल टाईम्स ऑफ इंडिया यांच्यावतीने घेण्यात आली. त्यांना या क्षेत्रातील सर्वोच्च रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये अचिव्हर्स एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला. त्यांचा गावच्यावतीने व मंदिर कमिटीच्यावतीने अध्यक्ष प्रमोद पाटील व ज्येष्ठ सदस्य राजशेखर भेंडीगेरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
स्चेप्पर डेव्हलपर्सचे संचालक विनायक जांबोटकर यांचा सत्कार ट्रस्टचे सदस्य अशोक भेंडीगेरी व सुभाष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक डेव्हलपर यल्लाप्पा कांबळे यांचा सत्कार कमिटी सदस्य प्रवीण खर्डे व राहुल बांडगी यांच्या हस्ते करण्यात आला. सेवानिवृत्त अभियंते दशरथ पाटील यांचा सत्कार राजू बडमंजी व नागेश चिक्कमठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उदय सायनाक यांनी तसेच यल्लाप्पा कांबळे, विनायक जांबोटकर व दशरथ पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गावचा विकास व सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहीन, असे सांगितले. तत्पूर्वी लक्ष्मी मंदिरमध्ये देवीची आरती करण्यात आली. यावेळी कमिटीचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंडप्पणावर, संजू कडेमनी, श्रेयांश पाटील, संजु पाटील, राजू बुद्दण्णावर, सुधीर भेंडीगेरी, नाभिराज पाटील, चेतन बुद्दण्णावर व गावातील पंच, ज्येष्ठ नागरिक, युवक मंडळांचे सदस्य, पुजारी व नागरिक उपस्थित होते. कृष्णा जठार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.