For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक्सवरुन करता येणार डिजिटल पेमेंट

07:00 AM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक्सवरुन करता येणार डिजिटल पेमेंट
Advertisement

नवी दिल्ली : अमेरिकेतील दिग्गज व्यावसायिक एलॉन मस्क हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक नवी प्रणाली सुरु करणार आहेत. एक्स अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आता लवकरच डिजिटल पेमेंट करता येणार असल्याची माहिती आहे. ही सुविधा कंपनी पुढील महिन्यात सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रणालीचे नाव एक्स मनी असे ठेवले जाणार असल्याचे समजते. या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे घेता किंवा पाठवता येऊ शकणार आहेत. यामध्ये वॉलेट टॅब दिला जाणार असून त्यामार्फत वापरकर्त्यांना आपल्या पैशाची देवाणघेवाण व पेमेंटसंबंधीचे काम करता येणार आहे. बँक खात्यातील किंवा डेबिटकार्डमधील पैसे एक्सच्या वॉलेटमध्ये हस्तांतरीत करण्याचीही सुविधा यात असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.