For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्च तिमाहीत डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम नफ्यात

06:03 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मार्च तिमाहीत डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम नफ्यात
Advertisement

183 कोटींचा मिळवला नफा, 2264 कोटींचा महसूल

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी पेटीएम (वन 97 कम्युनिकेशन)ने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून कंपनी तिमाहीत नफ्यात राहिली आहे. जानेवारी ते मार्च 2026 च्या तिमाहीत  कंपनीने 183 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.

Advertisement

किती मिळवला महसूल

एक लक्षात घ्या की, मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीला 540 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. केवळ वर्षभरातच कंपनी नुकसानीतून बाहेर पडत कमबॅक करत आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने 2264 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी हाच महसूल 1912 कोटी रुपयांचा होता. म्हणजेच मागच्या तुलनेत यंदा महसुलात 18 टक्के वाढ झाली आहे. मर्चंटस् सबस्क्रिप्शनची संख्या तिमाहीत 1.51 कोटीवर पोहचली आहे. कंपनीने वर्षभरात 27 लाख नवे मर्चंटस् (व्यापारी) जोडले आहेत.

युपीआय व्यवहारात वाढली हिस्सेदारी

पेमेंट कंपनी पेटीएमच्या चौथ्या तिमाहीत युपीआय व्यवहारात दमदार वाढ झाली आहे. युपीआय सरासरी व्यवहार मूल्य वर्षाच्या आधारावर 46 टक्के वाढले आहे. गेल्या 12 महिन्यात सातत्याने दर महिना कंपनीची बाजारातील हिस्सेदारी वाढतीच दिसली आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रात पेटीएमने आपला दबदबा वाढवल्याचे हे द्योतक आहे.

Advertisement
Tags :

.