सावंतवाडीत डिजिटल मीडिया वर्कशॉप संपन्न
सावंतवाडी : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्र यांच्यावतीने डिजिटल मीडियातील संधी यावर वर्कशॉपचं आयोजन आज सावंतवाडी येथे करण्यात आले होते . सिंधुदुर्गातल्या पहिल्यांदाच अशा पद्धतीचा वर्कशॉप आयोजित करण्यात आला . या वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुरुवातीला दीपप्रज्वलन करून या वर्कशॉपचं उदघाटन करण्यात आले . यावेळी श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, इतिहास अभ्यासक जी . ए . बुवा यांच्या उपस्थितीत उदघाटन पार पडलं. डिजिटल मीडियातील संधी, कंटेन्ट कोणता निवडावा, येणाऱ्या अडचणी, बदलतं बातम्याचं स्वरूप, व्हिडीओ एडिटिंग कसं करावं, व्हायरल बातम्या करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात आलं. ब्लू बे स्टुडिओ अँकर, पत्रकार रश्मी नर्से जोसलकर, व्हिडीओ एडिटर नितीन जोसलकर, डिजिटल कंटेन्ट क्रिएटर, अँकर गौरीश आमोणकर, कोकणसाद LIVE च्या अँकर जुईली पांगम यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या वर्कशॉप मध्ये जर्नालिजमचे विद्यार्थी, युट्युबर्स, ब्लॉगर यांनी सहभाग घेतला होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या राणे- सामंत यांनी तर, श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी आभार मानले.