For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मतभेद शिगेला

06:43 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
नॅशनल कॉन्फरन्समध्ये मतभेद शिगेला
Advertisement

श्रीनगरचे खासदार राजीनामा देणार : पक्ष सोडण्याची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

नॅशनल कॉन्फरन्सचे श्रीनगर लोकसभा खासदार आगा रुहुल्ला मेहदी आता लोकसभा सदस्य राहणार नाहीत. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही राहणार नाहीत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वैचारिक संघर्षामुळे आगा रुहुल्ला मेहदी यांनी हे पाऊल उचलले आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाने निवडणुकीत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाने याच आश्वासनावर निवडणूक लढवली होती. आता, पक्ष त्या आश्वासनासाठी लढण्यास नकार देत आहे. त्यामुळेच मला आता राजीनामा द्यायचा आहे. मला खोटेपणा आणि विश्वासघाताचा भाग व्हायचे नाही, असा दावा त्यांनी केला आहे. खासदार आगा रुहुल्ला मेहदी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे औपचारिकपणे सादर करतील. तसेच ते पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून आपला राजीनामा फारुख अब्दुल्ला यांच्याकडेही सादर करतील.  आगा हे नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष म्हणून पोटनिवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.