For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा सन्सच्या लिस्टिंगवरून टाटा ट्रस्टमध्ये मतभेद

06:36 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा सन्सच्या लिस्टिंगवरून टाटा ट्रस्टमध्ये मतभेद
Advertisement

आयपीओला नोएल टाटांचा विरोध, 8 मेच्या बैठकीत तिढा सुटणार?

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई: टाटा सन्सच्या आयपीओ लिस्टिंगबाबत नव्याने वाद उदभवला आहे. टाटा ट्रस्टमध्ये यामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे आयपीओ सादरीकरण रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोएल टाटा हे आयपीओच्या विरोधात असल्याची माहिती आहे. 8 मे रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये वरील बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शंका वर्तविली जात आहे.

Advertisement

नोएल यांचा विरोध

टाटा समुहातील सहकारी कंपनी टाटा सन्स हिला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या मुद्यावर समुहातील वरिष्ठ व्यवस्थापकांमध्ये मतभेद गडद झाले असल्याचे पहायला मिळते आहे. टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा हे टाटा सन्सला सूचिबद्ध करण्याच्या विरोधात आहेत. तर दुसरीकडे ट्रस्टचे दोन मोठे सदस्य रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीप्रमाणे आयपीओ सादर करण्याच्या बाजुने मत व्यक्त करत आहेत.

काय आहेत मते

टाटा ट्रस्टकडे टाटा सन्स यांची दोन तृतीयांश इतकी हिस्सेदारी आहे. यामध्ये टाटा सन्स यांचा आयपीओ सध्या वादामध्ये आहे. ट्रस्टचे दोन ट्रस्टी वेणू श्रीनिवासन आणि विजयसिंह हे टाटा सन्स आयपीओ सादरीकरणाला पाठिंबा देत आहेत. त्यांच्या मते आयपीओमुळे कंपनीची पारदर्शकता वाढणार आहे. पण या विरोधात नोएल टाटा यांची भूमिका असून ते मात्र टाटा सन्सला खासगी कंपनी रहावी यावरच ठाम आहेत.

आजच्या बैठकीवर लक्ष

याच दरम्यान शुक्रवार 8 मे रोजी टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून वरील मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळात नव्या ट्रस्टींची नेमणूक करण्यासंदर्भातसुद्धा निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.