For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्ध सुरूच राहिल्यास परिवहनला डिझेलचा तुटवडा

10:49 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्ध सुरूच राहिल्यास परिवहनला डिझेलचा तुटवडा
Advertisement

मध्यपूर्वेतील परिस्थितीविषयी मंत्री रामलिंगारेड्डी यांची प्रतिक्रिया

Advertisement

बेंगळूर : सध्या कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाला (केएसआरटीसी) डिझेलचा तुटवडा नाही. परंतु, मध्यपूर्वेतील युद्ध असेच सुरू राहिल्यास परिवहन महामंडळाला  डिझेलचा तुटवडा भासू शकतो, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना रामलिंगारेड्डी यांनी, आम्ही सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले, तर कच्च्या तेलाची आयात कमी होऊ शकते.

परिणामी देशांतर्गत डिझेलची उपलब्धता कमी होऊ शकते. याचा परिणाम केवळ कर्नाटकवरच नाही, तर संपूर्ण देशाच्या वाहतूक व्यवस्थेवर होईल, असे सांगितले. इस्रायल व इराणमधील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. भारत बहुतांश कच्च्या तेलाची आयात पश्चिम आशियाई देशांकडून करत असतो. परंतु, युद्धाच्या परिस्थितीचा स्थानिक बाजारपेठेवर थेट परिणाम होईल. राज्यातील परिवहन निगमसमोर आर्थिक अडचणी आहेत. डिझेल पुरवठा विस्कळीत झाल्यास प्रवाशी बससेवा सुरू ठेवणे आव्हानात्मक ठरेल, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.