डिझेल विक्री घसरली तर पेट्रोलची विक्री वधारली
दिवाळीच्या सट्टीत मालवाहतुकीत घट : 2.86 दशलक्ष टन पेट्रोलची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये डिझेलच्या विक्रीमध्ये घसरण दिसून आली आहे. वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये मागणी कमी राहिल्याने डिझेलची विक्री मागच्या महिन्यामध्ये भारतामध्ये 7.5 टक्के इतकी घसरणीत राहिली होती.
अनेक लोकांनी दिवाळीची सुट्टी घेतली होती. मागच्या महिन्यामध्ये डिझेलचा वापर 6.78 दशलक्ष टन इतका राहिला होता. वर्षामागे याच महिन्यात डिझेलचा वापर 7.33 दशलक्ष टन इतका होता. विविध उद्योगांना ट्रकमार्फत माल पोहोचवणाऱ्या ट्रक चालकांनी दिवाळीला सुट्टी घेतल्याने मालवाहतुकीसाठी होणाऱ्या डिझेलच्या वापरामध्ये घसरण दिसून आली. एकंदर सर्व इंधनांच्या बाबतीमध्ये पाहता डिझेलचा वापर हा सर्वाधिक मानला जातो. यामध्ये परिवहन क्षेत्राकडून जवळपास 70 टक्के डिझेल इंधनाची मागणी केली जाते.
पेट्रोल वाढीमागचे कारण
उत्सवी काळामुळे खासगी वाहनांच्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पेट्रोलची मागणी मात्र नोव्हेंबरमध्ये वाढलेली पाहायला मिळाली. मागच्या महिन्यामध्ये पेट्रोलच्या विक्रीमध्ये 7.5 टक्के वाढ होऊन मागणी 2.86 दशलक्ष टन इतकी राहिली होती. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या वापरामध्ये घसरणीचा अनुभव पहायला मिळाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाहता पेट्रोलची मागणी वर्षाच्या आधारावर पाहता नऊ टक्के इतकी खाली आली आहे. त्यातुलनेमध्ये डिझेलची विक्रीसुद्धा याच कालावधीत 3.2 टक्के घसरणीत दिसून आली. ऑक्टोबरमध्ये डिझेलची विक्री 6.5 दशलक्ष टन इतकी राहिली होती डिझेलची मागणी ही मान्सूनच्या हंगामात बहुतेक करून कमीच दिसून येते.