लोहयुगाची भारतात सुरुवात?
वैज्ञानिकांना मिळाले उत्तर
जगात आतापर्यंत तुर्कियेला लोहाचे उत्पादन सुरू करणारे सर्वात पहिले क्षेत्र म्हणून मानले जात राहिले आहे, परंतु अलिकडेच झालेल्या एका शोधाने लोहयुगाच्या सुरुवातीवरून नवी चर्चा सुरू झाली आहे. पुरातत्वतज्ञांना तामिळनाडूत 6 ठिकाणी लोहाने निर्मित सामग्री मिळाली असून ती 2953-3345 ख्रिस्तपूर्व काळापर्यंत जुनी आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या एका अध्ययनातून भारतातील एक क्षेत्र लोखंड वितळवून त्याचा वापर करणारे जगातील पहिले स्थान होते. प्रारंभी माणसांनी लोहाचा वापर सुरू केला तेव्हा ते दोन प्रकारचे होते. एक उल्कापिंडाद्वारे आणि दुसरे वितळविलेले लोखंड होते. वितळविले लोह अयस्कांपासून प्राप्त केले जायचे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासोबत याला लोहाच्या सुरुवातीसाठी जबाबदार मानले जाते. उल्कापिंडाचे लोह पृथ्वीवर कोसळलेल्या उल्कापिंडाद्वारे प्राप्त होते.
5300 वर्षांपूर्वी तामिळनाडूत राहणारे लोक लोह वितळविण्याविषयी जाणून होते आणि त्याचा वापर करत होते असा दावा राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अहवालात करण्यात आला आहे. याकरता 1200 ते 1400 अंश तापमानाची गरज असते. नव्या संशोधनातून लोह मिळविणे, वितळविणे आणि त्याला आकार देण्याची प्रक्रिया भारतीय उपखंडात सुरू झाली असावी असे मानले जात आहे.
लोहयुगाचा मिळाला पुरावा
पुरातत्वतज्ञांनी तामिळनाडूच्या आदिच्चनल्लूर, शिवगलाई, मयिलाडुमपराई, किलनामंडी, मंगडू आणि थेलुंगनून स्थळांवरून नमुने जमा केले आहेत. शिगलाई येथून प्राप्त कोळसा अन् भांड्यांचे तुकडे (सिरॅमिक सामग्रीचे) यांचा इतिहास 2953-3345 ख्रिस्तपूर्व काळातील आहे. याला जगभरात लोह तंत्रज्ञानाचा पहिला ज्ञान वापर मानण्यात येत आहे. वेगवेगळ्या स्थळांवरून पुरातत्व तज्ञांना लोहाने निर्मित कुदळ, भाले, तीराचे टोक, छेनी, कुऱ्हाड आणि तलवारी देखील मिळाल्या आहेत.
लोहयुगाची सुरुवात अनातोलियाच्या हित्ती साम्राज्यात झाल्याचे दीर्घकाळापासून मानले जात राहिले आहे. तेथे लोहाचे तंत्रज्ञान बहुधा 1300 ख्रिस्तपूर्व काळाच्या आसपास विकसित झाले होते. परंतु तामिळनाडूतील शोध हा दावा चुकीचा ठरवितो. याचमुळे लोहयुगाची सुरुवात आतापर्यंत मानल्या जाणाऱ्या कालावधीपेक्षाही एक हजार वर्षांपूर्वी झाला असावा. पुरातत्वतज्ञांना अद्याप हे समजून सिद्ध करण्यास काही काळ लागणार आहे.