For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेशचे आव्हान कार्लसनने स्वीकारले? गुकेश व कार्लसन

06:44 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुकेशचे आव्हान कार्लसनने स्वीकारले  गुकेश व कार्लसन
Advertisement

वृत्तसंस्था/ विज्क आन झी

Advertisement

नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने नवा वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या डी गुकेशविरुद्ध खेळण्याचा विचार चालविला असून तसे त्याने सकंते दिले आहेत.

गुकेश सध्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत खेळत असून वर्ल्ड चॅम्पियन झाल्यापासून तो बराच चर्चेत आहे. प्रत्येक सामना झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर चाहत्यांचा त्याच्याभोवती गराडा पडलेला असतो. तो या स्पर्धेचा मुख्य आकर्षण ठरला असून गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये त्याने चीनच्या डेंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा बहुमान मिळविला.

Advertisement

कार्लसन माजी वर्ल्ड चॅम्पियन असून त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याने आता विचार बदललाय असे वाटत असून गुकेशविरुद्ध खेळण्याची शक्यता त्याने बोलून दाखविली आहे. तो सध्या मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धिबळ 24 साठी समालोचन करीत आहे. ‘टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेने आपल्याला अनेक चांगल्या आठवणी दिल्या आहेत. या अव्वल खेळताना पाहतो तेव्हा त्यांच्याशी आपणही खेळावे असे वाटते. पण सध्या प्रेक्षक म्हणून मी खूप आनंदी आहे. मात्र मी पुनरागन करण्याची शक्यता नाकाता येत नाही. क्लासिकल स्पर्धा खेळणे कमी झाले आहे. मात्र शेवटचा चान्स म्हणून ते मी पुन्हा खेळू शकेन,’ असे कार्लसन म्हणाला.

वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलमध्ये तो पुन्हा सामील झाला तर त्याला विश्वविजेतेपदासाठी गुकेशला आव्हान देता येईल. पण त्यासाठी कार्लसनला आधी 2026 ची कँडिडेट्स स्पर्धा जिंकावी लागेल.

Advertisement

.