डायना अनहर्ड’ डॉक्यू-सीरिज लवकरच
डायना अनहर्ड‘ नावाची एक नवी डॉक्यूमेंट्री सीरिज आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी तयार आहे. यात प्रिन्सेसन डायना यांची अशी ऑडिओ रिकॉर्डिंग्स आहेत, जी पूर्वी कधीच ऐकली गेली नाहीत. यात त्या स्वत:चे जीवन, प्रेम अन् राजघराण्याविषयी बोलताना ऐकू येतील. या डॉक्यूमेंट्री सीरिजचे हक्क सिनेफ्लिक्सला मिळाले आहेत. आता या सीरिजला कान येथील मिपकॉप इव्हेंटमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. तीन हिस्स्यांमधील ही सीरिज ‘लव मंडे टीव्ही’ने तयार केली आहे. ही युनायटेड किंगडममधील एक प्रॉडक्शन कंपनी असून तिने ब्रिटिश राजघराण्यावर अनेक शो निर्माण केले आहेत.
डायना अनहर्डच्या निर्मात्यांना अशा संभाषणाच्या रिकॉर्डिंग्स प्राप्त झाल्या आहेत, ज्या डायना यांनी 1991 मध्ये स्वत:चा मित्र जेम्स कोलहर्स्टसोबत गुपचूपणे तयार केल्या होत्या. याच संभाषणाच्या आधारावर एंड्य्रू मॉर्टनने स्वत:चे खळबळजनक पुस्तक ‘डायना : हर ट्रू स्टोरी’ लिहिले होते. ‘लव्ह मंडे’ने मॉर्टन आणि कोलहर्स्टसोबत मिळून या रिकॉर्डिंग्समधील संभाषण प्राप्त केले. या ऑडियो टेप्समध्ये डायना यांनी प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिलाविषयीही उल्लेख केला आहे. तसेच प्रिन्स एंड्य्रूविषयी संभाषण केले आहे, ज्यांचे राजघराण्याचे सदस्यत्व जेफ्री एपस्टीनसोबतच्या संबंधांमुळे काढून घेण्यात आले होते.
डायना अनहर्ड तयार करताना आम्ही अशा नॅरेटिव्हला आव्हान देऊ इच्छित होतो, ज्यात अनेकदा वेल्सची राजकन्या डायना यांना केवळ एक पीडित म्हणून दाखविण्यात आले होते. यात डायना घटनांची मूकदर्शक नव्हे तर एका अशा महिलेच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे, जी स्वत:ची कहाणी स्वत: ठरविते. ती स्वत:चा आवाज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वकाही पणाला लावते असा दावा लव मंडे टीव्हीच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर केरेना बेयरफील्ड यांनी केला आहे.