For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांचा सलग दुसरा पराभव

03:34 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांचा सलग दुसरा पराभव
Advertisement

दुसऱ्या टी 20 सामन्यात द.आफ्रिका 8 विकेट्सनी विजयी : मालिकेत 2-0 ने आघाडी : 3 बळी घेणारी क्लोई ट्रॉयन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ डर्बन

भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघ 147 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर आफ्रिकेने विजयी लक्ष्य 17.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा सामना दि. 22 रोजी होईल.

Advertisement

प्रारंभी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. 13 व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या 2 बाद 99 धावा होती. पण यानंतर फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताने अवघ्या 48 धावांत आपले शेवटचे 8 गडी गमावले. शेफाली वर्माने 57 धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने 28 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. मोक्याच्या क्षणी महिला फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघाचा डाव 20 षटकांत 147 धावांत आटोपला.

दक्षिण आफ्रिकेची विजयी धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात झाली. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड आणि सुने लुस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी 106 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर ठराविक अंतराने या दोघीही आऊट झाल्या. लॉराने 34 बॉलमध्ये 54 धावांचे योगदान दिले तर सुनेने 46 चेंडूत 57 धावा जोडल्या. यानंतर तान्झिम ब्रिट्सने नाबाद 20 आणि डर्कसेनने 12 धावा करत दक्षिण आफ्रिकेला 17.1 षटकांतच विजयी केले.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ 20 षटकांत सर्वबाद 147 (शेफाली वर्मा 57, स्मृती मानधना 12, जेमिमा रॉड्रिग्ज 2, अनुष्का शर्मा 28, अरुधंती रे•ाr 14, क्लोई ट्रॉयन आणि तुमी सेखुखूने प्रत्येकी 3 बळी)

दक्षिण आफ्रिकन महिला संघ 17.1 षटकांत 2 बाद 148 (लॉरा वॉल्वार्ड 54, सुने लुस 57, ब्रिटस नाबाद 20, डर्कसेन नाबाद 12, श्रेयांका पाटील 2 बळी).

Advertisement

.