पावणेआठ कोटींचे हिरे बेंगळूर विमानतळावर जप्त! दुबईकडे होत होती बेकायदेशीर तस्करी
चिक्कबळ्ळापूर येथील दोन प्रवाशांना अटक :
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला बेकायदेशीरपणे वाहतूक होत असलेले 7.76 कोटी ऊपये किमतीचे 8,053 पॅरेट वजनाचे हिरे, 4.62 लाख ऊपये किमतीचे यूएस डॉलर आणि दिरहम चलन जप्त करण्यात आले आहे. हवाई गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या चिक्कबळ्ळापूर येथील दोन प्रवाशांना अटक केली आहे.
या दोघांनी मुंबईहून बेंगळूरला हिरे आणले होते. तसेच चॉकलेट पॅकमध्ये लपवून बेकायदेशीरपणे दुबईला घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. हवाई गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने धावपट्टीवर दुबईच्या दिशेने उ•ाण करण्यासाठी तयार असलेल्या विमानाची तपासणी केली. यावेळी प्रवाशांच्या बॅगेमध्ये चॉकलेट पॅकमध्ये लपवलेले हिरे सापडले आहेत.
यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तस्करीच्या जाळ्यातील आणखी दोन सदस्य हैदराबाद विमानतळावरून दुबईला आणखी हिरे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, येथील अधिकाऱ्यांनी तात्काळ हैदराबाद गुप्तचर संचालनालयाला याची माहिती दिली. यानंतर हैदराबाद विमानतळावर 6.03 कोटी ऊपयांचे हिरे आणि 9.83 लाख ऊपयांचे अमेरिकन डॉलरचे चलन जप्त करण्यात आले. हिरे तस्करीच्या जाळ्याविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.