मालवणात मधुमेह तपासणी आणि औषध वाटप शिबीर संपन्न
मालवण । प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पुणे येथील उद्योजक श्री.सागर वाडकर यांच्या पुरस्कृत मधुमेह तपासणी शिबीर आणि औषध वाटप शिबीर दि. 25 व 26 फेब्रुवारी रोजी, दैवन्य भवन मालवण येथे संपन्न झाले. या शिबिराचे सकाळी 10.30 वाजता उद्योजक श्री. सागर वाडकर यांनी दीपप्रज्वलन करून केले.या शिबिरात पुणे येथील डॉ. ए.एच. इनामदार यांनी रुग्णांना रक्तातील साखर आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मार्गदर्शन मोफत आयुर्वेदिक औषध वाटप करण्यात आले . शरीरातील छोटी -मोठी दुखणी योगाने कशी बरी होतील असे योगासनाचे प्रकार प्रकार यावेळी दाखविण्यात आले. डॉ . इनामदार यांच्या सोबत त्यांची पूर्ण टीम ही सोबत आली होती. या शिबिराचा लाभ 80 रुग्णांनी घेतला. 25 गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. महेश अंधारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गणेश प्रभुलकर मानले यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष ला.महेश अंधारी,झेंडसी ला. विश्वास गावकर, सेक्रेटरी ला.फेनी फनार्डीस, खजिनदार ला. पल्लवी खानोलकर, ला.जयश्री हडकर, ला.रुजरीओ पिंटो,ला. उमेश शिरोडकर, ला.मेघश्याम शंकरदास, ला.गणेश प्रभुलकर, ला. सहदेव बापार्डेकर, ला. मुकेश बावकर, ला. मोहन पटेल, ला.मुकेश बावकर, ला. लक्ष्मीकांत खोबरेकर, ला. वैशाली शंकरदास , मातृत्व आधार फाउंडेशनचे श्री. संतोष लुडबे, श्री.दादा वेंगुर्लेकर उपस्थित होते