ध्रूव राठीच्या अडचणी वाढल्या,
6 ऑगस्टला सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप नेते सुरेश कमरशी नखुआ यांच्याकडुन दाखल मानहानीच्या याचिकेप्रकरणी युट्यूबर ध्रूव राठीला न्यायालयाने समन्स जारी केला आहे. राठीने कथित स्वरुपात नखुआ यांना ‘हिंसक आणि अपमानास्पद’ ट्रोल संबोधिले हेते. याप्रकरणी साकेत न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी ध्रूव राठीला नोटीस जारी करत 6 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.
नखुआ यांच्यावतीने वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी युक्तिवाद केले. राठीने 7 जुलै रोजी स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात राठीने भाजप नेते नखुआ यांना ‘हिंसक आणि अपमानास्पद ट्रोल’चा ह्स्सा ठरविले होते. यामुळे आपली मानहानी झाल्याचा दावा नखुआ यांनी केला आहे. न्यायालयाने याप्रकरणी राठीला समन्स जारी केला आहे.
ध्रूव राठी हा प्रसिद्ध यूट्यूबर असून त्याचे 23 दशलक्षाहुन अधिक सब्सक्रायबर्स आहेत. ध्रूव राठी सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर व्हिडिओ अपलोड करत असतो. ध्रूव राठी हा आम आदमी पक्षाचा हस्तक असल्याचा आरोप अनेक जण करत असतात.