महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ध्रुव जुरेलची चमक, राहुल अपयशी

06:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/मेलबोर्न

Advertisement

गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने इंडिया अ संघाला पहिल्या डावात 161 धावांत गुंडाळले. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 2 बाद 53 धावा जमविल्या. इंडिया अ संघातील ध्रुव जुरेलने शानदार अर्धशतक झळकविले. तर अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज के. एल. राहुल पुन्हा अपयशी ठरला. तो चार धावांवर बाद झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ ने नाणेफेक जिंकून इंडिया अ ला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलिया अ च्या भेदक गोलंदाजीसमोर इंडिया अ चा डाव कोलमडला. इंडिया अ संघातील पहिले चार फलंदाज केवळ 11 धवांत तंबूत परतले. सलामीच्या ईश्वरनला आणि साई सुदर्शनला खाते उघडता आले नाही. के.एल. राहुल आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड हे प्रत्येकी 4 धावांवर बाद झाले.

Advertisement

ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. पडिक्कलने 55 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. पडिक्कल बाद झाल्यानंतर जुरेल आणि नितीशकुमार रे•ाr यांनी सहाव्या गड्यासाठी 39 धावांची भर घातली. रे•ाrने 35 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. मात्र एकाकी लढत देणारा जुरेल 186 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 80 धावा जमवित नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. इंडिया अ चा डाव 57.1 षटकात 161 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलिया अ तर्फे मायकेल नेसरने 27 धावांत 4 तर वेबस्टरने 19 धावांत 3, बोलँड, रॉचीसिओली आणि मॅकस्वीनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने आपल्या डावाला सावध सुरुवात केली. कर्णधार मॅकस्वीनी आणि हॅरीस यांनी 31 धावांची भागिदारी केली.

संक्षिप्त धावफलक : इंडिया अ प. डाव 57.1 षटकात सर्वबाद 161 (ध्रुव जुरेल 80, पडिक्कल 26, नितीशकुमार रे•ाr 16, प्रसिद्ध कृष्णा 14, अवांतर 11, नेसर 4-27, वेबस्टर 3-19), ऑस्ट्रेलिया अ प. डाव 17.1 षटकात 2 बाद 53 (हॅरीस खेळत आहे 26, मॅकस्वीनी 14, बॅनक्रॉफ्मट 3, कॉन्स्टास खेळत आहे 1, अवांतर 9, मुकेशकुमार व खलिल अहमद प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article