For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धिनिधी देसिंघू अंतिम फेरीत

06:53 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
धिनिधी देसिंघू अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था, डकार (सेनेगल)

Advertisement

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची धिनिधी देसिंघू हिने महिलांच्या 100 मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी धिनिधी ही भारताची पहिली महिला जलतरणपटू आहे.

बेंगळूरच्या 16 वर्षीय धिनिधीने महिलांच्या 100 मी. फ्रिस्टाईल प्रकारात पात्र फेरीत 56.80 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. क्रोएशियाची अॅना बोबानोव्हीक 56.22 सेकंदांसह पहिल्या स्थानावर तर न्यूझीलंडची अॅलिसा लॉसन 56.53 सेकंदासह दुसऱ्या स्थानावर राहिली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकातील धिनिधी ही सर्वात कमी वयाची जलतरणपटू होती.

Advertisement

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या ज्युडो प्रकारात 63 किलो वजन गटात भारताच्या खुशबु रजकभाई दड्रा गिनीयाच्या कॅमेराचा पराभव करून पुढील फेरी गाठली.

Advertisement
Tags :

.