For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धीरज ढाणेच्या खुनाचा कट उधळला

01:59 PM Feb 21, 2025 IST | Radhika Patil
धीरज ढाणेच्या खुनाचा कट उधळला
Advertisement

सातारा : 

Advertisement

विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडणे झाली होती. त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते. याचा राग मनात धरुन निलेश वसंत लेवे याने आरोपी अनुश चिंतामणी पाटील यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्याकरीता निलेश लेवे याने अनुश पाटील यास 2 लाख रुपये अॅडव्हान्स दिलेला होता. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सातारा शहर पोलीस ठाणे यांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यातील एक जण फरार आहे.

अनुज चिंतामणी पाटील (वय 21, गुरुवार पेठ, सातारा), दिप भास्कर मालुसरे (वय 19, रा. गुरुवारपेठ सातारा), आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 25, रा.हनुमाननगर इचलकरंजी कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (वय 25, रा. जवाहरनगर इचलकरंजी कोल्हापूर), क्षितीज विजय खंडाईत (रा. गुरुवार पेठ, सातारा), निलेश वसंत लेवे (रा. चिमणपुरा पेठ सातारा), विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) या इसमांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 2 देशी बनावटीची पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 4 रिकाम्या पुंगळ्या, 2 मोटार सायकल, 2 लोखंडी सुरे, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 4 लाख 41 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यातील शाहूनगर परिसरामध्ये बीट मार्शल 2 यांना डायल 112 वरुन संपर्क साधून माहिती देण्यात आली की, अजिंक्यतारा किल्ल्याचे पायथ्याला असणारे मंगळाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडच्या समोर असलेल्या मैदानामध्ये काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती मिळताच बीट मार्शल 2 वर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. तेथे गेल्यानंतर त्यांना काही इसम उभे असल्याचे दिसले. त्यातील काही इसमांच्या हातामध्ये लोखंडी सुऱ्या सारखी हत्यारे दिसल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे स्थानिक गुन्हे शाखा गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील जादा मनुष्यबळ घटनास्थळी पाठविण्याबाबत कळविले.

त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ते सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार होते असे सांगितले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याच गुह्यातील तपासामध्ये आरोपी अनुज चिंतामणी पाटील याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडणे झाली होती. त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते याचा राग मनात धरुन निलेश वसंत लेवे याने आरोपी अनुज चिंतामणी पाटील यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्याकरीता निलेश लेवे याने अनुज पाटील यास 2 लाख रुपये अॅडव्हान्स दिलेला होता. त्यानुसार पोलिसांनी निलेश वसंत लेवे व विशाल राजेंद्र सावंत यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी फायरिंग करण्याची तपासणी यांनी केली होती. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे.

  • तपासाचे शिलेदार

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय दराडे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, अजय जाधव, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, रविराज वर्णेकर, मोनाली निकम, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, विनायक मानवी, तुषार भोसले, सागर गायकवाड, होमगार्ड इंगळे यांनी केली आहे.

  • कोल्हापूरच्या आरोपींवर मोक्का आणि तडीपारी

निलेश लेवे याने कोल्हापूरचे सराईत गुन्हेगार आनंद जाधव व अक्षय कुंडूगळे यांना सुपारी दिली. पोलिसांनी त्यांना अटक करताच गुह्याची कुंडली बाहेर काढली. तेव्हा यांच्यावर मोक्का व तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. 21 मर्डर व दरोडा असे गंभीर गुन्हे या दोघांवर दाखल आहेत. ते तडीपार केल्यापासून कोल्हापूर जिह्यातून फरार झाले आहेत.

  • एपीआय शिवाजी भेसलेंची दमदार कामगिरी

आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय शिवाजी भोसले यांना सर्वात प्रथम या आरोपींची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षकांना ही माहिती सांगताच, त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस त्यांच्या मार्गावर होते. तोच अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याजवळ असल्याची माहिती मिळताच त्यांनी यांच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement
Tags :

.