धैर्यशील माने यांच्या लोकसभा क्षेत्राच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
इचलकरंजी
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या लोकसभा क्षेत्रातील प्रचार यंत्रणेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. आणि इचलकरंजीतील भाजपा कार्यालय हे निवडणुकीतील सहा विधानसभेचे मुख्य कार्यालय झाल्याचे घोषित करण्यात आले.
हुलगेश्वरी रोड वरील कार्यालयाबाहेर यावेळी प्रचार रथाचा शुभारंभ ही मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास वस्त्राsद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाजपा जिल्हाप्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर, मनसेचे मोहन मालवणकर, रिपाई आठवले गटाचे श्रीनिवास कांबळे, राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, संगायोचे अध्यक्ष अनिल डाळ्या, माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव, उदय बुगड, मिश्रीलाल जाजू, रवि रजपुते, तानाजी पोवार, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, संतोष शेळके, किसन शिंदे, प्रकाश पाटील, चंद्रकांत शेळके, तसेच बाळकृष्ण तोतला, राजेश रजपुते, महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुबडगे, अशोक सालेचा, देवेन गांधी, नितीन कोठारी आदीसह महायुती मधील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.